महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर .अंतुले यांनी रेवस -रेड्डी सागरी महामार्ग व्हावा यासाठी मोठे प्रयत्न केले होते.परंतु त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करणार असून रेवस -रेड्डी महामार्ग पूर्ण झाल्यास मुंबई हि रायगडच्या अगदी जवळ येणार आहे.यासाठी दिल्लीत सुरु होणाऱ्या पहिल्या अधिवेशनात रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेणार असून हा सागरी महामार्गसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रायगडचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी मुरुड येथे केले आहे.मुरुड मधील शेतकरी कामगार पक्ष,राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातर्फे त्यांचा नागरी सत्कार माळी समाज गृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी ते आपल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
   यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर,शेतकरी कामगार पक्षाचे मुरुड तालुका चिटणीस मनोज भगत,काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक,जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार,जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष श्रद्धा ठाकूर,ऍड इस्माईल घोले,नेहा पाके,जिल्हा उपाध्यक्ष स्मीता खेडेकर,अतिक खतीब,माजी जिल्हा परिषद सदस्य सुबोध महाडिक,विजय पैर ,नितीन पवार, 
 नगरसेवक बाबा दांडेकर,राजाभाऊ ठाकूर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     यावेळी खासदार सुनील तटकरे आपल्या भाषणात म्हणाले कि, रायगड लोकसभा निवडणुकीत झालेला विजय हा माझा नसून सर्वसामान्य नागरिकांचा आहे.शेकाप व काँग्रेस पक्षाचे नेते माझ्या निवडणुकीसाठी एकत्र आले याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो.श्रीवर्धन प्रमाणे मला मुरुड तालुकायने उत्तम साथ देत १० हजार मतांचा लीड देत विजयात महत्वाचा वाटा उचलला आहे.मुरुडच्या प्रश्नाबाबत मी सजग असून दिलेल्या मतांचा अनादर होणार नाही  याची मी काळजी घेणार आहे.जास्तीती जास्त विकास निधी मुरुड ला देण्याचा माझा मानस आहे.मुंबई -गोवा महामार्ग जलद गतीने पूर्ण होण्यासाठी मी प्रयत्न करणार असून लवकरच आपणास याचा रिझल्ट मिळणार आहे.खासदार निधी बरोबरच केंद्र शासनाच्या विविध योजना या मतदार संघात पूर्णत्वास नेणार आहे.मुरुड हे पर्यटन स्थळ असून या तालुक्यास राष्ट्रीय दर्जा कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत.
    रायगड जिल्ह्यात बीएसएनएल सेवा डबघाईला आली आहे त्याच प्रमाणे राष्ट्रीय कृत बँका केंद्र शासनाच्या योजना कार्यन्वित करण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे गरीब व मध्यम वर्गीय लोकांना यांचा फायदा मिळत नाही.त्यामुळे या दोन्ही खात्यातील अधिकारी वर्गाची बैठक लावली असून काही दिवसात यांचा कारभार सुधारलेला असल्याचे आपणास दिसून येणार आहे.यापूर्वीचे खासदार लोकांना किती वेळा भेटले हे लोकांना चांगलेच ठाऊक आहे परंतु मी किमान दोन महिन्यातून एकदा निश्चित भेटणार आहे.लोकांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.तुमच्या मतांवर मी खासदार झालो आहे त्यामुळे जनतेचे प्रश्न हे माझे असतील असे स्पष्ट प्रतिपादन यावेळी सुनील तटकरे यांनी केले.तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी तालुक्यातील रस्ते यांची रुंदी वाढून ते सुसज्ज होण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात यावे अशी मागणी केली तर तालुका चिटणीस मनोज भगत यांनी मुरुड समुद्र किनारा सुशिभिकरण करण्यात येऊन तालुक्याच्या विकासाठी जास्तीती जास्त निधी देण्याची मागणी यावेळी केली.काँग्रेस चे तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक यांनी तटकरे साहेब विकास कामे करण्यात मागे पडणार नसल्याचे प्रतिपादन केले. 
 यावेळी आघाडी तर्फे सुनील तटकरे यांची भव्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. सदरील कार्यक्रमासाठी शेकडो च्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 
मुरुड येथील माळी समाज गृहात आघाडी तर्फे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर,शेकाप तालुका चिटणीस मनोज भगत,तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष महाडिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुनील तटकरे यांचा जंगी स्वागत पुष्पगुछ देऊन नागरी सत्कार करताना दिसत आहेत.यावेळी त्यांच्या  समवेत अतिक खतीब व माजी जिल्हा परिषद सदस्य सुबोध महाडिक दिसत आहेत.

अवश्य वाचा