आगरदांडा 

समुद्राकाठी रहाणार्‍या व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ  अर्पण करण्याकरिता मुरुड कोळीवाड्यातील नवापाडा  वतीने  परंपरे नुसार नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात सजवलेल्या सोन्याच्या नारळाची पुजा करून वाजत गाजत सोन्याच्या नारळाची मिरवणूक काढुन दर्या राजाला अर्पण करण्यात आला.या उत्सवात कोळी वाड्यात आनंदाचे वातावरण पसरलेले पाहायला मिळत होते.  पारंपरिक कोळीगीतांवर ठेका धरून दर्यासागराला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा समुद्रकिनारी   उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात.

सणाच्या आनंदाबरोबरच यंदा भरपूर मासे मिळून चांगला व्यापार होऊ दे आणि सुखशांती मिळू दे, असे साकडे कोळीबांधवांनी दर्यासागराला घातले.यावेळी या मिरवणूकीत सागरकन्या सोसायटीचे चेअरमन- मनोहर बैले , मनोहर मकु , कोळीबाधंव व महिला वर्ग  उपस्थित होते. 

 

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !