अलिबाग

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेत अनेक जनावरांचा मृत्यू झाला असून जिवंत राहिलेल्या जनावरांना चारा मिळत नाही. ही बाब हेरून येथील राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना मदतीसाठी सरसावली आहे. त्यांनी जवळपास १५ टन हिरवा चारा स्वत: कापून पूरग्रस्त भागातील जनावरांना पाठविला आहे. त्यामुळे नेहमीच नकारात्मक दृष्टीने पाहण्यात येणाऱ्या या शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांकडे आता मानाने पाहील जात आहे.

अलिबाग तालुक्यातील सहाण बायपास रस्त्यालगत असलेल्या शासकीय जागेत असलेला जवळपास १५ टन ओला चारा होईल इतका बुधवारी दुपारी पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी पाठवून देण्यात आला आहे. सांगलीतील पूरस्थितीत जनावरांचेही हाल होत असल्याची जाणीव होताच त्यांनी हे पीक चारा म्हणून देण्याची तयारी दाखविली. चारा वाहून नेण्याची त्यांच्याकडे व्यवस्था नव्हती. हा चारापूरग्रस्त भागात पोचवण्यासाठी या कर्मचाऱ्यांनीच स्वत: वर्गणी काढून वाहनाची व्यवस्था केली केली होती.  तसेच रायगड जिल्हयातील सर्व कर्मचारी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधिला देणार आहेत.

पूरग्रस्त भागात  गुरांना चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे या करीता रायगड पशुचिकित्सा व्यावसायी संघटना, तसेच रायगड जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हापरिषद कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्या संयुक्त विध्यमाने आज अलिबाग तालुक्यातील सहाण गावातील १५ टन हिरवा चारा कर्मचाऱ्यांनी कापून सांगली जिल्हयातील पूरग्रस्तांना पाठविला. पेण तालुक्यांतून १५ टन सुका चारा पाठविण्यात येणार आहे, गुरुवारी माणगाव येथून सुका चारा, पेंड व अन्य खाद्य तसेच औषधे, खनिज द्रव्य पाठविण्यात येणार आहे.

 

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !