पनवेल 

       तळोजा एम आय डीसी येथे एका 30 वर्षीय ईसमाचे पॉकेट पडले होते.  रिक्षा चालकाच्या प्रामाणिकतेमुळे सापडून आले आहे. या पाकिटामध्ये तीन एटीएम कार्ड व पाच हजार रुपये होते. 

          नेरेपाडा येथील राम खुटले हे कामानिमित्त तळोजा एमआय डीसी विभागात गेले होते. त्यावेळी त्यांचे पाकीट पडले. ते घरी आल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली. काही वेळाने एका रिक्षा चालकाचा त्याला फोन आला व त्याला त्याचे पाकीट मिळाले असल्याचे सांगितले. खिडुकपाडा येथील आत्माराम दत्ता उलवेकर यांनी 5 हजार रुपये व तीन एटीएम असलेले पाकीट राम याना परत केले आहे. रिक्षा चालकाच्या या प्रामाणिक तेचे कौतुक केले जात आहे. 

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !