आज श्रीवर्धन तालुक्यातील वीज पुरवठा संपूर्ण दिवस भर कांदळगाव ते पाभरे टॉवर लाइन वरील दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्याची आगाऊ सुचना महावितरणने दिली होती. एरवी देखिल श्रीवर्धन तालुक्यात वीज पुरवठा खंडीत होणे हि नित्याचीच गोष्ट झाली आहे. अशा वेळी श्रीवर्धन येथील पोष्ट ऑफिस मध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झालेले पहायला मिळतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कार्यालयाकडे जनरेटर उपलब्ध आहे, परंतु तो सुस्थितीत नसल्यामुळे कार्यालयीन सेवा बंद राहते याला जवाबदार कोण अशी चर्चा पोष्ट ऑफिस जवळ संबंधित ग्राहकांकडून केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोष्ट ऑफिस मधील जनरेटर बंद आहे, परंतु जिल्हा पोष्ट मास्तरांना कदाचित या गोष्टींची माहिती नाही असेच दिसून येते. श्रीवर्धन तालुक्याचे ठिकाण असून ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपल्या विविध कामांसाठी पोष्ट ऑफिस मध्ये येत असतात. परंतु वीज पुरवठा खंडीत झाल्याचे कारण पुढे करुन पोष्टातील कर्मचारी नागरिकांना परत पाठवितात. पोष्ट खाते केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असुन श्रीवर्धन येथील नागरिक या प्रकारामुळे नाराज आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर ऑफिस मधील कर्मचारी मोबाईलवर लागलेले पहायला मिळतात. केन्द्र शासनाच्या आस्थापनेतील कर्मचारी असे कृत्य करत असतील तर ती खेदाचीगोष्ट आहे. तरी रायगडच्या मुख्य पोष्ट मास्तरांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

अवश्य वाचा