पनवेल 

      नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यासह कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला. अद्यापही कोल्हापूर शहर पाण्याखालीच राहिले असल्यामुळे राज्यातून येणारी मदत ही कोल्हापूर आणि संगलीमधील अर्ध्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकली नाही. मात्र राजे प्रतिष्ठानने इस्लामपूर तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन शासकीय अधिकाऱ्यांसमक्ष जीवनावश्यक वस्तूंचा केलेला पुरवठा कौतुकास्पद असल्याचे मत इस्लामपूर उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी केले. 

       यावेळी इस्लामपूर तालुक्याचे तहसीलदार सबनीस तसेच आष्टाचे तहसीलदार शेरखाने यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली, यावेळी प्रांत अधिकारी नागेश पाटील यांनी बोलताना सांगितले की, आज महाराष्ट्रातील इतर राज्यातून नागरिक, विविध सामाजिक संघटना, प्रशासन आपापल्या परीने मदत कार्य करीत आहेत. मात्र याठिकाणी बाहेरून वस्तूरूपाने मदत करण्यासाठी येणाऱ्यांना येथील काही ठराविक स्थानिक दिशाभूल करून ठराविक गावांमध्येच ही मदत पोहोचविण्यासाठी भाग पाडत आहेत. त्यामुळे तालुक्यातील दुर्गम भागातील नागरीक यामुळे वंचित राहत आहेत, मात्र राजे प्रतिष्ठान मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड यांच्यावतीने करण्यात आलेले मदत कार्य नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. राज्यातून येणारी मदत ही कपडे आणि अन्नधान्य, पाणी घेऊन येत आहे, मात्र राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून चादर, कपडे, पुरुष व स्त्रियांचे सर्व प्रकारची वस्त्रे, अन्नधान्य, पिण्याचे पाणी, कंगवा, पायाला चोळणारा बाम, माचीस, अगरबत्ती, मेणबत्ती, जेमिनी तेल, बिस्कीट, लहान मुलांसाठी कुरकुरे पाकिटे, आदींसह औषधे व विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. आज पूरग्रस्त नागरिकांना ज्या ज्या अत्यावश्यक गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपल्या माध्यमातून पोहोच केल्या. असे बोलत त्यांनी यावेळी राजे प्रतिष्ठानचे आभार मानले, तसेच राजे प्रतिष्ठानच्या या कार्याची दखल घेत त्यांनी तहसील विभागामार्फत नोंद करून तसे पत्र राजे प्रतिष्ठानला दिले. तसेच स्थानिक तहसीलदार यांनी विशेष लक्ष ठेवून काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

      यावेळी राजे प्रतिष्ठानचे मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत धडके उर्फ मामा, मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी, रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, मुंबई सचिव संजय गुप्ता, नवी मुंबई अध्यक्ष संदीप बागडे, उपाध्यक्ष अजय साळुंखे, महाराष्ट्र महिला संघटक प्रमुख स्वाती बागडे, नवी मुंबई महिला कार्याध्यक्षा अर्चना पार्टे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल उंब्रटकर, प्रसाद तुपे, रोहन तांबे, अनिकेत काटे, मयुरेश उंब्रटकर, अमित घाटे, आकाश खाटपे, अक्षय सूर्यवंशी, गणेश पवार, उदय चोप्रा, रितेश गावडे, विकी राणे, प्रीतम भोसले, सयाजी चव्हाण, भुषण मोरे, नवी मुंबई सल्लागार आनंद सोनावणे, विशाल कटके, अमोल डांगे, विजय लोहार, सुनील वरेकर, पिंट्या तुपे, राज भंडारी, भूषण गजरे, किरण पालये, राजू मोरे, शंकर, अनिकेत अंकुश आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !