१४ ऑगस्ट २०१९

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत म्हसळा तालुक्यातील मौजे वाशी, केलटे, रूद्रवट, खारगाव खुर्द इत्यादी गावातील लाभार्थींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन कार्डवाटप आणि मोफत गॅस कनेक्शन चे वाटप कार्यक्रम तहसीलदार शरद गोसावी यांच्या हस्ते खारगाव खुर्द येथे आयोजित करण्यात आला.या प्रसंगी सरपंच   वनिता खोत,माजी सभापती महादेव पाटिल, शिवसेना म्हसळा तालुका उपतालुका प्रमुख निशा पाटील,उपसरपंच नरेश मेंदडकर,सदस्य ऍड.मुकेश पाटिल, पुरवठा अधिकारी सानप,एच.पी.गॅस चे मालक भाऊ गंद्रे,दीप्ती गंद्रे,भालेकर,तलाठी कल्पेश पाटिल, अश्विनी पाटिल,  सुशिल यादव,गणेश बोर्ले,मांदाटणे सरपंच चंदू पवार,जेष्ठ नागरिक एल.पी.खोत,वाशी सरपंच जगन्नाथ तांडेल ,ग्रामसेवक डी. एच.गमरे,संतोष उद्धरकर,इम्तियाज मेस्त्री आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार शरद गोसावी यांनी सांगितले की दिवसेंदिवस जंगले नष्ट होत असून सरपणासाठी लाकडांचा तुटवडा आणि रॉकेलची तीव्र टंचाई यामुळे अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे आणि अडचण भविष्यात त्रासदायक ठरत असल्यामुळे गॅसचा वापर अत्यावश्यक असल्याचे तहसीलदार शरद गोसावी यांनी सांगितले.गॅसच्या वापराबद्दल अनभीज्ञ असण्याऱ्या ग्रामिण भागातील महिलांना इत्यंभूत माहिती देणाऱ्या दीप्ती गंद्रे यांचे तहसीलदार शरद गोसावी यांनी विशेष कौतुक केले.

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !