पनवेल 

    दुर्मिळ वनौषधी बियांचे वाटप, वृक्ष लागवड, वृक्ष वाटप, वनौषधी परिचय शिबीर आदी भरगच्च कार्यक्रमानी आर्या प्रहरचा सहावा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी आर्या वनौषधी संस्थेचे सुबोध म्हात्रे, जनार्दन मोकल, पत्रकार ऋषीकेश थळे आदी मान्यवर उपस्थित होते.                                                

     यावेळी काडे चिराईत, सर्पगंधा, विजयासार, अर्जून, लालचित्रक, पांढरा चित्रक, मेढशिंगी, मालकांगोणी, सितेचा अशोक, अग्निशिखा, वज्रदंती आदी दुर्मिळ वनौषधी बियांचे वाटप करण्यात आले. अल्पावधीतच वनौषधी प्रेमींच्या ह्र्दयात स्थान मिळवणाऱ्या आर्या प्रहरच्या वर्धापनदिनी नवीन पनवेल येथे वनौषधी परिचय शिबीर घेण्यात आले. या शिबिरात आर्या प्रहरचे सुधीर पाटील यांनी सारिवा, पुनर्नवा, अर्जून, कांचनार, पेव, अर्क, वासा, मुरुडशेंग, धात्री, अगस्त, अपामार्ग, पाताळगारुडी, दगडीपाला, अमृता, काकजंघी, दमवेल, मधूपर्णी, मल्टीव्हिटामिन, गुडमार आदी ६० प्रकारच्या वनौषधींची ओळख व औषधी गुणधर्मांची माहिती दिली. संध्याकाळच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते केवडा, काडे चिराईत, दमवेल, गुडमार, चित्रक आदी वनौषधी रोपांचे वाटप करण्यात आले.

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !