पनवेल 

      तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने आजपर्यंत विविध उपक्रम राबवून तालुक्यात आपले नाव कोरले असताना आता शिवकर ग्रामपंचायत चंदन शेतीकडे आपला मोर्चा वळविताना दिसत आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी येथील शाळकरी विद्यार्थी, कन्यारत्नांना ही रोपे देऊन मान्यवरांच्या हस्ते लागवड करण्यात येणार असल्याची माहिती शिवकर ग्रा.प.चे सरपंच अनिल ढवळे यांनी दिली आहे. 

       यावेळी 2000 चंदनाची रोपे लागवडीखाली या गावामध्ये लावण्यात येणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती मा.आ.बाळाराम पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य अधिकारी जिल्हा परिषद, अतिरिक्त अधिकारी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, उप कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, वनक्षेत्र अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, यावेळी शिवकर जि प शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला चंदनाचे रोप देऊन 16 ते 19 दरम्यान जन्मलेल्या कण्यारत्नांना चंदनाची रोपे देऊन सन्मानित करण्यात येणार. तसेच शिवकर गावामध्ये ज्यांना कन्यारत्न प्राप्त आहे अशांनाही ही रोपे देण्यात येणार आहेत, यावेळी बोलताना सरपंच श्री.ढवळे यांनी सांगितले की, चंदन शेती करण्यासाठी शिवकर ग्रा.प.ने पुढाकार घेऊन चंदन शेतीचे महत्व पटवून देऊन पर्यावरण संतुळत राखण्याच्या दृष्टिकोनातून इतर झाडे लागवडीखाली शेतामध्ये लागवड करीत असताना शेतीपूरक व्यावसायिक जोड धंदा म्हणून चंदन शेतीकडे पाहता ग्रा.प.हद्दीतील 40 ते 50 शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंद केली आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने नैसर्गिक शेती करण्यासाठी जून महिन्यामध्ये उपक्रम राबवून गावातील 21 शेतकऱ्यांनी गतवर्षी नैसर्गिक शेती केली आहे, असे वेगवेगळे उपक्रम राबविणारी पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत असून चंदन लागवडीचा उपक्रम येत्या 20 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी दिली. 

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !