खरोशी दि.14

महिला गृहिणी माणुसकीच्या नात्याने एकत्र येऊन  तालुक्यातील पूरग्रस्त गावांना मदत करणे काळाची गरज आहे असे ओळखून  शिर्की चाळ नंबर एक येथील पुरग्रस्तांना मदतीचा हात पुढे  केला .

स्वतः घरोघरी फिरून तसेच स्वतःचे पैसे टाकून दोन दिवसांमध्ये भरपूर अशा सामानाची जमवाजमव केली.पेणमधील दातार आळी महिला मंडळाच्या  सुषमा दातार यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या या मदत कार्यात आशा जोशी, माधुरी दातार, विदुला आठवले, रमा लिमये, नेहा देवल, प्रतिक्षा थत्ते माधवी लिमये, अमृता लिमये, श्रेया लिमये, शर्वरी जोशी, पूजा थत्ते, शरयू फडके ,हर्षदा जोशी, शेखर जोशी ,महेश हेलवाडे यासारख्यांनी एकत्र येऊन माणुसकीचे दर्शन घडवले.शिर्की चाळ नंबर  1 येथील 120 पूरग्रस्तांना तूरडाळ ,काबुली चणे, चवळी, साखर, बिस्किटे, राजगिरा लाडू ,आणि कपडे अशा विविध वस्तूंचे वाटप करून खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवले पेणमधील दातारआळी महिला मंडळ रणरागिनी आमच्या गावाला येऊन केलेली मदत आम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवू कारण या महिलांनी केलेले कार्य आमच्या गावासाठी हृदय भरून येण्यासारखा आहे त्यामुळे त्यांच्या कष्टाचं खऱ्या अर्थाने चीज झाले आहे असे गावकऱ्यांकडून अच्युत पाटील ,गोपीचंद पाटील, रामचंद्र पाटील, रामदास पाटील ,विठोबा म्हात्रे, हिराजी पाटील ,तुळशीदास पाटील, जगदीश पांडुरंग म्हात्रे शंकर पाटील नरेश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !