पाताळगंगा १४ ऑगस्ट,

      भारताला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले.या उद्देशाने बाजार पेठेत तिरंग्याचे विविध साहित्य बाजार पेठेत दाखल झाले आहे.प्रत्येक देश प्रेमीची वेगवेगळे विचार असतात.मात्र हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्यवसाईकाने झेंडे,टि शर्ट,स्टिकर असे विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध केल्या आहे.ग्राहकांच्या पसंती नुसार तसेच लहान मुलांच्या आग्रहामुळे त्यांच्या पसंतीच्या वस्तू विक्रीस ठेवावे आल्या आहेत.

       स्वातंत्र्य दिनांचे औचित्य साधून तालुक्यातील बाजार पेठ सजली असून शाळेय विद्यार्थी पासून ते राजकीय मंडळी या दिवशी तिरंगा चे लॉगो घेत असतात.तर लहान मुले टि शर्ट विकत घेत असतात.यामुळे हा दिवस म्हणजे आपल्या पुर्वजांच्या शौर्यांचा दिवस असून याच दिवशी आपणांस स्वातंत्र्य मिळाले.अनेक वर्ष गुलामगिरीत जखडून पडलो होतो. या निमित्ताने विविध ठिकाणी ध्वजारोहण चा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या सोबत तिरंगा चे स्टिकर अथवा या रंगाचे कपडे परिधान करीत असतो.

       काही तासांवर स्वातंत्र्य दिन आल्यामुळे शाळेय अथवा शासकीय ठिकाणी नियोजन सुरु आहे.त्याच बरोबर पावसाची क्षणंभर विश्रांती देत असल्यामुळे व्यवसायीकासाठी मोठी पर्वणी वाटत आहे.यामुळे विविध ठिकाणी आठवड्यातून एकदाच भरत असलेल्या बाजार पेठेत मोठ्याप्रमाणावर अर्थिक उलाढाल होत आहे.

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !