राबगाव/पाली 

सुधागड तालुक्यातील आगरी समाज आपल्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी एकवटला असून संपुर्ण सुधागड तालुक्यातील आगरी समाजाला एकत्र करण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात पाली येथे सुधागड तालुक्यातील आगरी समाजाची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत सुधागड तालुक्यातील आगरी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चाविनिमय करण्यात आले. सुधागड तालुक्यातील आगरी समाजासाठी एक भव्यदिव्य हाॅल बांधण्याचा संकल्प करण्यात आला. या बैठकीत आगरी समाजाचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांचे नाव आगरी समाजाचे युवानेते ललित ठोंबरे यांनी अध्यक्षपदासाठी सुचविले. त्यास सर्व उपस्थित आगरी बांधवांनी एकमताने सहमती दर्शवली. त्यामुळे सुधागड तालुका आगरी समाजाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ज्ञानेश्वर पाटील यांचे सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. सामाजिक प्रश्नांची त्यांना चांगलीच जाणिव आहे. शासन दरबारी काम करवून घेण्याचा ज्ञानेश्वर पाटील यांचा हातखंडा आहे. त्यामुळे सुधागड तालुक्यातील आगरी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील यांची अध्यक्षपदी झालेली निवड योग्य असल्याचे मत समाजातून व्यक्त होत आहे. ज्ञानेश्वर पाटील म्हणाले की, सुधागड तालुक्यात आगरी समाज मोठ्या संख्येने रहात असून सुधागडच्या जडणघडणीत आगरी समाजाचे फार मोठे योगदान आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात आगरी समाज हा नेहमीच अग्रेसर राहीलेला आहे. परंतु आगरी समाजाच्या अनेक समस्या आहेत. त्या राजकारणापलिकडे जावून सोडविण्याची गरज आहे. आणि त्याचसाठी सुधागड तालुक्यातील आगरी समाज संघटीत झाला आहे. सुधागड तालुक्यातील तमाम आगरी समाजाने माझी अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली आहे त्याबद्दल मी संपुर्ण आगरी समाजाचा अत्यंत आभारी आहे. ज्ञानेश्वर पाटील यांची सुधागड तालुका आगरी समाज अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून श्री स्वामी समर्थनगर रहीवासी मंडळानेही ज्ञानेश्वर पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

 

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !