वेणगाव 

रायगड जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये मोफत गणवेश वाटपात  भ्रष्टाचाराचा चाळलेल्या अनियमतेचा सावळा गोंधळा बाबत  शिक्षण मंत्री व जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे चौकशीची मांगणी  सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य उपाध्यक्ष अॅड . कैलास मोरे यांनी केली आहे.

शासनाकडून जिल्ह्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील इ.1 ली ते 8 वीतील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीची मुले, व दरिद्री रेषेखालील सर्व संवर्गातील पालकांची मुले यांना प्रत्येकी दोन गणवेश वाटप केले जाते.सदरची गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन कमिटीच्या खात्यावर दिली जाते. असं असताना कर्जत मध्ये तसेच सर्व जिल्हात सदरचे गणवेश कुणाकडुन तरी शिवुन आणुन जबरदस्तीने शिक्षकांवर दबाव आणुन वाटप करण्यात येत आहे व सदरच्या रकमेचे कोरे  धनादेश  शिक्षकांकडुन घेतले जात आहे. शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना जबरदस्तीने व्यवस्था पन कमिटीच्या खात्यावर पैसे न टाकता नियमबाह्य निकृष्ठ दर्जाचे गणवेश वाटप करण्यात येत आहे.दि.१६.७.२०१९ रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड यांचे मोफत गणवेश वाटपासंदर्भात स्पष्ट आदेश असताना गटशिक्षणाधिकारी कर्जत यांचे कडुन हुकुमशाही आदेश का? व कुणाच्यासाठी? असा प्रश्न सम्यक विद्यार्थी आंदोलन ने केला आहे. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी प्रत्येक शाळेत व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे.सदर समितीमार्फत गणवेश वाटप केले जाते. परंतु कर्जत मध्ये व रायगड जिल्हात हे सर्व नियम धाब्यावर बसवून नियमबाह्य गणवेश वाटप केले जात आहे.सदरचे गणवेश कुठल्याही प्रकारे मुलांचे माप न घेता त्यांना वाटप केले जात आहे. आणि गणवेशाचा दर्जा सुद्धा निकृष्ठ आहे.ह्या सर्व प्रकरणात कुणाचतरी हित जपलं जात आहे असा संशय अॅड.कैलास मोरे यांनी व्यक्त केला.

यासाठी आज सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राज्य उपाध्यक्ष अॅड.कैलास मोरे यांचे शिष्टमंडळाने कर्जत तालुका गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेतली व त्यांना मोफत गणवेश वाटपामध्ये होत असलेल्या अनियमितेबद्दल चर्चा करुन अंदागोंधी कारभार थांबविण्यास सांगितले आहे त्यावर गटशिक्षणाधिकारी यांनी सदर निवेदनाची  दखल घेवुन चाललेले बेकायदेशीर वाटप थांबविण्याचे अश्वासन दिले असल्याचे अॅड . कैलास मोरे यांनी सांगीतले आहे. संपुर्ण रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत गणवेश वाटपासंदर्भात चाललेला सावळागोंधळ व अनियमतेबाबत चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करणेची मागणी निवेदनामार्फत मा.शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हाअधिकारी रायगड यांना केली आहे.यावेळी निवेदन देताना सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राज्य उपाध्यक्ष अॅड कैलास मोरे, भारिपचे तालुका अध्यक्ष सुनिल गायकवाड, युवा सरचिटणीस राहुल गायकवाड, युवा नेते धर्मेंद्र मोरे, दिनेश घोडके, रोशन शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !