उरण दि 14

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून उरण तालुक्यात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा 2019 व रायगड जिल्हास्तरीय 19 वे द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉनचे आयोजन शुक्रवार दि 9/8/2019 ते रविवार दि 11/8/2019 दरम्यान करण्यात आले होते.सदर स्पर्धेत 3500 हुन अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती फुटबॉलसाठी संपूर्ण राज्यातुन 16 संघानी तर शालेय फुटबॉलसाठी 8 संघानी सहभाग घेतला. अतिशय नावाजलेले संघ यात सहभागी होते. द्रोणागिरी फुटबॉल स्पर्धा 2019 या स्पर्धेचे उदघाटन  9/8/2019 रोजी सकाळी 9:30 वा. स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, उरण येथे तर द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉन, तसेच राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते, वकील, इंजिनीअर, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्यासाठी खास उरण अभिमान दौड 2019 चे रविवार 11 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. नवीन शेवा, BPCL रोड, उरण आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धांना खेळाडू, जनतेसह क्रीडा रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गुणवंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत. एक उत्तम व्यासपीठ(प्लेटफॉर्म)खेळाडूंना द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन या नामवंत व प्रसिद्ध संघटनेच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेस दरवर्षी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सीने अभिनेते आवर्जून भेट देतात.जनतेचाही उत्तम प्रतिसाद दरवर्षी मिळत असतो. पक्षविरहित असलेल्या या द्रोणगिरि स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.या स्पर्धांचा निकाल जाहिर झाला असून राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक- डॉमिलिशन बॉइज खोपोली(रोख रक्कम 50,000 व भव्य ट्रॉफी),द्वितीय क्रमांक-इव्हरग्रीन मुंबई(रोख रक्कम 25000 व भव्य ट्रॉफी),बेस्ट गोलकीपर रोहित पाटिल, गोल्डन बूट-ओमकार निकम(डॉमिलिशन बॉइज खोपोली),बेस्ट डिफेंडर-अरबाज खान (ईव्हरग्रीन मुंबई),पब्लिक हीरो-उस्मान(मुन्ना)सय्यद(ईवर ग्रीन संघ मुंबई)तर आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक-सेंट मेरिज स्कूल उरण, द्वितीय क्रमांक-द्रोणागिरी इंग्लिश मीडियम हायस्कूल करंजा यांनी घवघवीत यश मिळविले.जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत 7 वर्षा खालील पुरुष गटात निशांत म्हात्रे, स्त्री गटात कल्याणी जायकर,9 वर्षा खालील गटात प्रथम क्रमांक मयूरी चव्हाण, तर पुरुष गटात मित माधवी,12 वर्षा खालील गटात प्रथम सार्थक पाटिल तर स्त्री गटात वैभवी मोहिते,14 वर्षा खालील गटात प्रथम क्रमांक तनुजा पाटिल,18 वर्षा खालील गटात मृणाल सरोदे, प्रतीक्षा कुलये तर उरण अभिमान दौड या आगळया वेगळ्या स्पर्धेत पुरुष गटात रूपेश म्हात्रे तर स्त्री गटात अर्चना भोईर प्रथम आले.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, वैशाली घरत, शिवेंद्र म्हात्रे, मनोज पडते, दिलीप तांडेल, भारत म्हात्रे,फारूक शेख, रोशन घरत,सचिन पाटिल,मुकेश घरत, स्वप्नाली बंडा,प्रियांका घरत, गौरी मंत्री आदि असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !