रक्षाबंधन आणि स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून यंदा अक्षय कुमारचा मिशन मंगल आणि जॉन इब्राहिमचा बाटला हाऊस  बॉक्स ऑफिस वर एकाच दिवशी धडकण्यास सज्ज आहेत.  हे दोन्ही चित्रपट रिअल लाइफ घटनेवर आधारित आहेत. अक्षयचा मिशन मंगल हा इस्रो नी यशस्वीपणे पार पाडलेल्या मंगल मोहिमे विषयी तर जॉन चा बाटला हाऊस दिल्ली मध्ये घडलेल्या कुप्रसिद्ध चकमकी विषयी आहे. दोन्ही चित्रपट्टांच्या ट्रेलरला भरगोस प्रतिसाद मिळत असून सगळीकडे  याचीच चर्चा रंगलेली पाहावयास मिळते.

आजकाल रियल लाइफ घटनेंवर चित्रपट करणं  म्हणजे एक नवीनच ट्रेंड आलाय जणू.  तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेला अक्षयनी बेबी, एयरलिफ्ट, टॉयलेट: एक प्रेम कथा,केसरी यासारखे देशभक्तीपर चित्रपट करत तर दुसरीकडे मद्रास कॅफे, परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण आणि आता बाटला  हाऊस  यासारखे चित्रपट करत जॉन आपलं ठाम व्यक्तिमत्व चाहत्यांवर उमटवत आहे. 

सुट्टी असल्याकारणाने प्रेक्षकांची पसंती ही सिनेमे पाहावयास असते. साधारण दोन किंव्हा अधिक सिनेमांची एकाच दिवशी होणारी टक्कर हे चित्र काही नविन नाही त्यामुळे कधीकधी वादविवाद सुद्धा होतात. अनेक चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत  असल्याने प्रेक्षक वर्ग सुद्धा विभागला जातो. 

परंतु अक्षय कुमार आणि जॉन इब्राहिम च्या बाबतीतलं चित्र काहीस वेगळ आहे. नुकताच अक्षय कुमारनी सोशिअल मीडिया द्वारे त्याचा आणि जॉनचा फोटो प्रदर्शित केला. त्यामध्ये अक्षयनी जॉन ला पाठीवर घेऊन 'मेक सम नॉईज फॉर देसी बॉईज' असं लिहलं  आहे. चाहत्यांनी या फोटोला अनेक लाइक देत "दुसऱ्यांदा तुम्हा दोघांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असून तुमची एकमेकांसोबत असलेली मैत्री आम्ही नेहमीच पसंत करतो" अशा प्रकारचे ट्विट केले आहे. 

ही जोडी बॉक्स ऑफिस वर काही नवीन नाही. यापूर्वीही 'गरम मसाला' आणि 'हाऊसफुल २' च्या मार्फत या जोडीनी धमाल उडवलेली होती. तसेच गेल्या वर्षीही १५ ऑगस्ट ला अक्षय आणि जॉन चा गोल्ड आणि सत्यमेव जयते हे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होऊन चांगली कमाई केली होती. 

मिशन मंगल बद्दल अक्षय बोलतो,' मी हा चित्रपट मुख्यतः मुलांसाठी बनविला आहे जेणेकरून त्यांना वैज्ञानिक होण्यास प्रोत्साहन मिळावे. एक व्यवसाय म्हणून शास्त्रज्ञ होणे फारसे साध्य नाही, परंतु इस्रोच्या चंद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर लोकांना शास्त्रज्ञाची गरज व तिचे महत्व अधिक ठाऊक होत आहे. मला आशा आहे की हा चित्रपट तो किती चांगला व्यवसाय आहे हे सांगू शकेल."

एकीकडे चित्रपटांची चढाओढ चालू असताना ऑनलाईन आगाऊ बुकिंगचे वारे वाहताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ऑनलाईन आगाऊ बुकिंग मध्ये मिशन मंगल सध्या आघाडीवर आहे. तसेच पहिल्या दिवशी दोन्ही चित्रपटांनी अंदाजे २० ते ३० करोड चा डल्ला मारण्याची शक्यता आहे.

 

अवश्य वाचा