अलिबाग 

शासनदरबारी प्रलंबित असणार्‍या मागण्या आणि तात्काळ पूर्ण कराव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने क्रांती दिनापासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. सरकारने मागणी मान्य केले नाही तर 27536 ग्रामपंचायतींच्या चाव्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करून राज्यातील 22 हजार ग्रामसेवक कामबंद आंदोलन करणार आहेत. असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने दिला आहे . प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी ग्रामसेवक युनियनने सरकारला 22 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे. 

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी रायगड जिल्ह्यातील ग्रामसेवक युनियन रायगड जिल्हा परिषदेसमोर दिवसांचे धरणे आंदोलन करून निदर्शने केली. आपल्या मागण्यांचे निवेदन संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केले.

शासन दरबारी प्रलंबित असणार्‍या मागण्या ग्रामसेवक पद रद्द करण्यात येऊन पंचायत विकास अधिकारी पदनिर्मिती करणे,

 ग्रामसेवक संवर्गात प्रवास भत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करणे, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बदल करून पदवीधर ग्रामसेवक नेमणुका करणे,  सन 2011च्या  लोकसंख्येवर आधारित ग्रामविकास अधिकारी पदे वाढ करणे,  ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दूर होणे,  सन 2005 नंतरचे ग्रामसेवक यांना पेन्शन लागू करणे  जुनी, आदर्श ग्रामसेवक आगाऊ वेतनवाढ करून एक गाव एक ग्राम सेवक निर्मिती करणे, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करणे.

असहकार आंदोलनाचे टप्पे

9 ऑगस्ट क्रांती दिन पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

13 ऑगस्ट जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

16 ऑगस्ट विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन

18 ऑगस्ट पालकमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन जाऊन निवेदन सादर करून लक्षवेध

20 ऑगस्ट  विकास मंत्री यांच्या शासकीय निवासस्थानासमोर उपोषण

21 ऑगस्ट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर

22 ऑगस्ट काम बंद आंदोलन

 

अवश्य वाचा