अलिबाग 

          अलिबागमध्ये डिजीटलायझेशन घडवून आणणे आणि अलिबाग मधील तरुणवर्गाला नोकरीच्या विविध वाटा उपलब्ध करून देण्याचा निर्धार पुर्ण करण्याच्या दृष्टीने इनिशिअलाईज ग्रुपने वाटचाल सुरु केली आहे.

         83 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत कृषीवलने नव्याने कात टाकत डिजिटल परिवर्तनाकडे पाऊल टाकले आहे. यासाठी इनिशिअलाईज ग्रुप अलिबाग मधील आयटी कंपनी आहे जी वेबसाईट डेव्हलोपमेंट, डिजीटल मार्केटींग, मोबाईल अ‍ॅप्लीकेशन डेव्हलोपमेंंट, सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट आणि डिजीटल सिनेमा अ‍ॅडर्व्हटायझींग अशा प्रकारच्या डिजीटल सर्व्हिस उपलब्ध करुन देत आहेत्र इनिशिअलाईज ग्रुपचे संस्थापक संकेत नाईक यांनी 20 ऑगस्ट 2017 रोजी आपले सहकारी व सहाय्यक संस्थापक विराज आंब्रे यांच्या सहकार्याने ही कंपनी आपल्या अलिबागमध्ये डिजीटल पर्व प्रस्थापित करण्यासाठी सुरु केली. अलिबाग मध्ये आयटी कंपनी सुरु करणे ह्यामागे त्यांच्या संस्थापकांचा केवळ हाच हेतू आहे कि, अलिबाग मध्ये डिजीटलायझेशन घडवून आणणे आणि अलिबाग मधील तरुणवर्गाला नोकरीच्या विविध वाटा उपलब्ध करून देणे. डिजीटल इंडिया संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या हेतूने इनिशिअलाईज ग्रुपसोबत जोडले गेलेले अलिबाग व अलिबाग बाहेरील व्यवसाय म्हणजे डिझाईनबी, सोनार्स एंटरप्रायझेस, अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्था, नाईक कोंकण फूड्स बाजार, एम जे एंटरप्रायझेस इत्यादी आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात एक विश्‍वासाचे नाव म्हणजे इनिशिअलाईज ग्रुप असे भविष्यात अलिबागमध्येच नव्हे तर संपूर्ण आयटी विश्‍वात आदराने घेतले जाईत यात शंकाच नाही.

https://www.initializegroup.com/

अवश्य वाचा