अलिबाग 

इंडियन मेडीकल असोसिएशनच्या अलिबाग शाखेच्यावतीने अलिबागमधील सर्व डॉक्टर्सनी एकत्र येत पूरग्रस्तांंना मदतीचा हात पुढे केला आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्त जनतेसाठी 1 लाख एक हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री पुरग्रस्त सहायता निधीसाठी जमा करण्यात आला. तसेच पुरग्रस्तांसाठी औषधांपासून ते कपडे, भांडी, काही आवश्यक चिजवस्तू, चादरी, ब्लँकेट, बॅगांसकट पाठविण्यात येणार आहेत. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि ज्ञानांकूर ट्रस्टचे डॉ अरविंद केळकर यांच्याकडे धनादेश आणि चिजवस्तू अध्यक्ष डॉ राजेंद्र चांदोरकर, सेक्रेटरी डॉ संजीव शटकार, खजिनदार डॉ. सतिश विश्‍वेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी डॉ एस एन तिवारी, डॉ चंद्रकांत वाजे, डॉ. विनायक पाटील, नगरसेवक अनिल चोपडा, डॉ. जन्नावार, डॉ कोतेकर, डॉ ओजस्विनी कोतेकर, डॉ अनिता शटकार, डॉ प्रगती पाटील, डॉ स्वाती विश्‍वेकर आदी डॉक्टर्स उपस्थित होते. विश्‍वेकर हॉस्पिटल, कुबेर बिल्डींग येथे पार पडलेल्या या समारंभात प्रस्तावना करताना अध्यक्ष डॉ राजेंद्र चांदोकर यांनी सांगितले, पिडीत जनतेसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची अलिबाग शाखा नेहमीच अग्रेसर राहिली आहे. सेक्रेटरी डॉ संजीव शेटकर यांच्या पुढाकारामुळे अगदी काही वेळातच सर्व डॉक्टर्सनी एकत्र येत ही संकल्पना उचलून धरली. आणि काही तासातच मोठया प्रमाणावर मदत उभी राहिली. डॉ संजीव शेटकर यांनी सांगितले की, मी स्वतः किल्लारी भुकंपाची भीषणता अनुभवली आहे. त्यामुळे आपादग्रस्तांना मदतीच्या हाताची नितांत गरज असते. राज्यभरातून मदतीचा ओघ सुरुच असला तरी त्यात वेगवेगळ्या प्रकारची मदत हवी असते. यापूर्वी अलिबागच्या डॉक्टरांच्या पथकाने डॉ तीवारी सरांच्या नेतृत्वाखाली त्सुनामी ग्रस्त अंदमान निकोबारमध्ये जाऊन तिथील आपादग्रस्त लोकांना वैद्यकीस सुविधा दिली होती.  

 

अवश्य वाचा