गोवे-कोलाड 

   सावित्री लहाने यांनी लग्नानंतर लाहाने कुटूंब अतिशय कष्टाने सांभाळले,त्यांच्या पुण्याईने लाहाने कुटुंब अतिशय नावारुपाला आले सावित्री बाईचे निधन ८२ वर्षांनतर झाल्यामुले त्यांचे मुर्तु आध्यात्मिक स्वरुपाचा आहे.त्या पुण्यवान होत्या.पुण्यवान असल्याशिवाय मनुष्य जन्म मिळत नाही असे मत रायगड भुषण ह.भ.प.शेळके महाराज यांनी सावित्री लाहाने यांच्या उत्तरकार्य विधि निमित्त आयोजित प्रवचन सेवेत व्यक्त केले.

    भरतात प्रथम तिरुपती बाळाजी,दुसरे शिरडीचे साईबाबा, तर तिसरे पंढरपूरचे विठोबा स्थान असुन जरी पंढरपुरचे विठोबाचे तिसरे स्थान असले तरी जन्मला आल्यापासून एकदा पंढरपुरला जाने आवश्यक आहे.मनुष्य जन्माला आल्यानंतर परमार्थ केला पाहिजे.संसार कमळाच्या फुलासारखा केला पाहिजे,गरीब, श्रीमंत, राजा आसला तरी मरण हे कुणालाच चुकला नाही.श्रावण बालानी आई-वडिलांची सेवा केली.गणपतीने जगाला प्रदक्षिणा मारण्याऐवजी आई-वडिलांना प्रदक्षिणा मारली त्याच प्रमाणे सर्वानी आई-वडिलांची सेवा करावी असे मत ह.भ.प.शेळके महाराज यांनी आपल्या प्रवचन सेवेत व्यक्त केले.तसेच नारायण धनवी व एकनाथ बागुल यांनी सावित्री लहाने यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली यावेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते.

अवश्य वाचा