सहजसेवा फौंडेशन,खोपोली व लायन्स क्लब ऑफ खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती वैद्यकीय उपकरणे  उपलब्ध करून देण्याचा नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आपण हि उपकरणे प्रति दिन १ रुपया नाममात्र भाड्यावर वापरायला नेऊ शकता. फक्त योग्य प्रकारे वापरा व परत करा असा संस्थेचा आग्रह राहणार आहे. १५ ऑगस्ट रोजी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 

 

आजारी मंडळींना काही दिवसांसाठी  कुबड्या, वॉटर बेड,व्हील चेअर, वॉकर,वॉकर काठी,सर्जिकल बेड व अन्य वस्तू अशा विविध गोष्टी आवश्यक असतात. आता या वस्तू आपल्याला विकत घेण्याची आवश्यकता नाही. वाजवी डिपॉझिट व अत्यल्प भाडे तत्वावर म्हणजेच प्रति दिन १ रुपया नाममात्र भाड्यावर या वस्तू आपल्याला मिळणार आहेत. आपण फक्त योग्य प्रकारे वापरून त्या परत करायच्या आहेत. तरी आपण या सेवेचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी 9975492470 / 9823376925 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आव्हान सहज सेवा फौंडेशन चे अध्यक्ष शेखर जांभळे, लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष लायन सुजित पडवळकर यांनी केले आहे.

अवश्य वाचा