लोकं भाजपा मध्ये प्रवेश करतात कि भाजपा वाले त्यांना पक्ष प्रवेश करायला लावतात याबद्दल नागरिकांच्यात कुतूहल असताना आणखीनच नवीन टुमणे बाहेर निघाले आहे,ते म्हणजे मागे पुढे न बघता सरळ खोट्या नावांच्या,व्यक्तींच्या नावाने बातम्या रंगवत पहा आमचा पक्ष किती मोठा होतो आहे असे फुगलेल्या बेडकी प्रमाणे दाखवण्याचा.पण यात अतिरेक झाल्यावर बेडकी फुटते हे भाजपा च्या खोट्या लोकांना केव्हा कळणार? 

     भाजपा ला आलेल्या पक्ष प्रवेशाच्या सुजेमुळे त्यांना खरे आणि खोटे यातील फरक लक्षात येत नाही. साम दाम दंड भेद यातील काहीही वापरून पक्षात आणायचे हि नीती त्यांना वेगाने अनंताकडे नेत  आहे. कसळखंड ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच अजित पाटील हे खरे तर लाल बावट्याचे सच्चे शिलेदार. शेकाप च्या शिकवणीतून घडलेला एक प्रामाणिक कार्यकर्ता! पण उगाच संभ्रम निर्मण करत स्वतःची पाठ थोपटून घ्यायची खाज असणाऱ्या ठाकूरांच्या पगारी मिडिया ने अजित पाटील यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्याच्या धादांत खोट्या बातम्या पसरविल्या. 

        अजित यांच्या पक्ष निष्ठेबद्दल जराही शंका नसल्याने कुणीही या बातमीने विचलित  झाले नाही त्यामुळे  तसेही भाजपा वाले तोंडावर आपटले. त्यांना अभिप्रेत असे काहीही घडले नाही. परंतु झाल्या प्रकाराने अजित पाटील व त्यांचे समर्थक  क्रोधीत झाले आहेत. भाजपा च्या खोट्या बातम्या पसरविण्याच्या हलके पणाचा  त्यांनी कठोर शब्दात निषेध केला आहे ते म्हणाले कि मा  आमदार विवेकानंद पाटील यांच्या  विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही माझ्या शेवटच्या श्वासाच्या पर्यंत मी शेकापचेच काम करणार! 

अवश्य वाचा