मुंबई 

लंडन येथील विम्बले महानगरपालिकेचे माजी महापौर भगवानजी चोहोन व त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची सदिच्छा भेट घेतली. या  भेटीत मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण, आरोग्य, प्रगतीशील कार्याबद्दल शिष्टमंडळाने महाडेश्वर यांचे अभिनंदन केले. 

लंडन येथील समाजसेवी संस्थांनी मुंबईतील पालिकेच्या शाळा व आरोग्य केंद्रे दत्तक घेण्याबाबतची इच्छा शिष्टमंडळाने व्यक्त केली. छत्रपतीं शिवाजी महाराज की जय या नामघोषाने लंडनमध्येही स्फुरण चढते़ छत्रपतींचा इतिहास अधिकाधिक सातासमुद्रापार पसरवण्यासाठी शिष्टमंडळ प्रयत्नशील असल्याबाबत मुंबई हाऊसिंग फेडरेशन तज्ज्ञ संचालक विशाल कडणे यांनी सांगितले. छत्रपती शिवरायांच्या जीवनपटावरील माहिती देणारे सुप्रसिद्ध जाणता राजा नाट्यप्रयोगासारखे महाराजांवरील विविध नाट्यप्रयोग व साहित्य लंडनमध्ये नेणेबाबत तेथील स्थािनक मराठी मंडळ प्रयत्नशील असून या कार्यक्रमास महापौर महाडेश्वर यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावावी, अशी विनंती शिष्टमंडळाद्वारे केली गेली. या बैठकीस माजी  महापौर भगवानजी चोहोन, लंडनचे नगरसेवक जेम्स एली, व्हिल्हेल्मइना मिशेल, मुंबई हाऊसिंग फेडरेशन तज्ज्ञ संचालक विशाल कडणे, व्यावसायिक विजय कडणे, वैभव भुर्के, विक्रम साठविलकर, चेतन वैद्य, शशिण मिस्त्री, सिद्धेश मिस्त्री, संजय परब, गौरव पोतदार उपस्थित होते.  

अवश्य वाचा