"ऑन ड्युटी 24 तास" व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्य तपासणीसाठी वेळ काढणे सहज शक्य होत नाही, ही खंत जाणून घेत ग्लोबल इनिशेटिव्ह फाऊंडेशन आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त उपक्रमातून खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्गासाठी मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते, त्यात  कर्मचारी वर्गांनी तपासणी केली आणि शंकांचे निरसन करून घेतले.

खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव बंडगर, खालापूरचे विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन केले गेले होते.

खोपोली शहरातील दंत चिकित्सक, डॉक्टर, इंजिनिअर, विधितज्ञ आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवकांच्या "गोल्डन इनिशेटिव्ह फाऊंडेशन या संस्थेने" सामाजिक कार्यात पदार्पण करताना शुभारंभ म्हणून या शिबिराचे प्लॅनिंग केले होते.

डॉ सुवर्णदीप पाटील, डॉ. तेजस्वीनी पाटील, डॉ आदित्य पाटील, डॉ श्रुकीर्ती पाटील, डॉ ऋतुराज पाटील, ऍड. प्रतीक मिश्रा, अक्षय सागणे, प्रवीण जाधव, पूजा साठेलकर, दुर्गेश पालांडे,  सीमा त्रिपाठी, निलेश पाटील, अमित चितळकर, गणेश शेळके, सुशांत म्हात्रे, दर्शन पापळ, विकी कालेकर, अक्षय पांडे तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीचे धर्मेंद्र रावळ, विजय भोसले, अमोल कदम, मितेश शहा हे  शिबिर यशस्वी आणि व्यापक होण्यासाठी मेहनत घेत होते.

पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने या उपक्रमासाठी आयोजकांचे आभार मानले.

अवश्य वाचा