जेएनपीटी दि १३

     बंदरासाठी विस्थापित करण्यात आलेल्या नवीन शेवे गावाचे सरपंच निशांत घरत यांनी जेएनपीटी विरोधात उपोषण पुकारले असून जोपर्यंत जेएनपीटी आपल्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आपले उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या आंदोलनाला येथिल विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच नवीन शेवे ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.नवीन शेवा गावचे सरपंच निशांत घरत यांनी प्रकल्पगस्ताच्या न्याय हक्कासाठी सूरू केलेल्या उपोषणामुळे जेएनपीटी बंदराचे व्यवस्थापक हातबळ झाले आहे.

       विस्थापित नवीन शेवे व हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी पुनर्वसना कायद्यानुसार दोन्ही गावांना जमिन देण्यात यावी, सिंगापुर बंदरात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सामावून घ्यावे आणि जेएनपीटी बाधीत गावातील तरूणांनाही रोजगार उपलब्ध करून देण्यात यावेत. जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंडाचा प्रश्न निकाली काढावा, एनएसआयजीटी मधील परप्रांतिय कामगारांवर कारवाई करा आदी मागण्या निशांत घरत यांनी केल्या आहेत. या बाबत जेएनपीटीचे मुख्य सचिव जयवंत ढवळे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देवून मागण्या संदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र सरपंच निशांत घरत यांचे समाधान न झाल्यामुळे हे आंदोलन पुढे सूरू ठेवले आहे.

    उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहरशेठ भोईर हे विधिमंडळातील कामकाजात या मतदारसंघातील जनतेचे प्रकल्पगस्ताचे प्रश्न मांडत असताना त्यांच्या जन्म भूमितील प्रकल्पगस्ताच्या न्याय हक्कासाठी सरपंचांवर उपोषणाला बसण्याची वेळ आल्याने सध्या आश्र्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

अवश्य वाचा