रोहा 

बिरवाडी येथील गणपती मंदिराच्या समोर उभारण्यात आलेल्या ब्राम्हण समाज सभामंडपाचा उदघाटन सोहळा आ पंडीत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.याप्रसंगी बोलताना आ पंडीत पाटील म्हणाले की, परमेश्वराची इच्छा असल्यानेच माझ्या कारकिर्दीत अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे भाग्य मला लाभले.विकासकामे करत असताना आम्ही मतांचा विचार करत नाही,यामुळेच ब्राम्हण समाज हा अल्पसंख्य असून देखील आमचे नेते आ भाई जयंत पाटील यांच्या आमदार फंडातून हे  समाजमंदिर उभे राहिले याचा मला आनंद होत आहे.

चणेरा विभागातील प्रत्येक गावात शेकापच्या माध्यमातून विकासकामे करण्यात आली आहेत.शेकाप हा काम करणारा पक्ष असून निवडणूक आली की खोटी आश्वासने देऊन मतदारांना भुलवण्याचे काम आम्ही करत नाही याची देखील मतदारांनी जाणीव ठेवली पाहिजे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.रेवदंडा रोहा मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले असून गौरी गणपतीच्या सणापूर्वी हे काम पूर्ण होईल.रेवदंडा रोहा या रस्त्याचे दिवाळी नंतर पुर्णपणे नूतनीकरण होणार असून त्यासाठी २२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामाचे कार्यादेश लवकरच निघतील असे देखील सांगितले. त्याचप्रमाणे बिरवाडी ते पांगळोली या रस्त्यासाठी पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे,भविष्यात या रस्त्याचे काम देखील मार्गी लागेल असे आश्वासन आ पाटील यांनी दिले.चणेरा विभागातील शेकाप कार्यकर्ते विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याने या विभागात अनेक विकासकामे झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी राजिप सदस्या भावना पाटील,सरपंच गीता वारगुडा, उपसरपंच जयश्री जोशी,जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी,विठ्ठल मोरे,जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन हेमंत ठाकूर,तालुका खजिनदार परशुराम वाघमारे, कार्यालयीन चिटणीस जितेंद्र जोशी, जिल्हा क्रीडा सेल सदस्य शशिकांत कडू,खरेदी विक्री संघ संचालक गोवर्धन कांडणेकर, बाजारसमिती संचालक गोपीनाथ गंभे,संदेश विचारे,पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष जीवन देशमुख, उपाध्यक्ष नंदेश यादव,विनायक धामणे,लियाकत खोत,ग्रामपंचायत सदस्य आत्माराम कासार,मयुरी मोरे,दिप्ती गिजे यांच्यासह विभागातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. बिरवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मिलेश ओलांबे,उपाध्यक्ष संदीप खेरटकर,नंदकुमार सावंत,दगडू चव्हाण, सुधीर ठाकूर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.बिरवाडी येथील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आ पंडीत पाटील यांनी दिले आहे.

 

अवश्य वाचा

असंवेदनशील राज्यकर्ते

निर्णय योग्य, पण...

पहिली जागतिक मराठी परिषद

सोनियांच्या द्वारी

तेजोपर्वाची अखेर

विश्‍वकवी रवींद्रनाथ टागोर