पनवेल

सांगली, कोल्हापूरसह देशभरात महापूराने हाहाकार माजविला आहे. मानवी जीवन अस्तव्यस्त झाले आहे. लाखो माणसं वाहून गेली आहेत. पोटच्या पोर्‍यासारखी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली जनावरं डोळ्यासमोर वाहून गेली. दुःखाला पारावार राहिला नाही. देशाच्या कानाकोपर्‍यातून मदतीचे हात सरसावले आहेत. सगळीकडे माणुसकीचे अंकुर वाढताना दिसत आहेत. यामध्ये खारीचा वाटा म्हणून सांगली किंवा कोल्हापूरातील एक पूरग्रस्त गाव दत्तक घेवून त्याचे उत्कृष्टरित्या पूनर्वसन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी आज शानदार कार्यक्रमातून घोषित करताच, सभागृहातून टाळ्यांचा पाऊस पडू लागला.

कवी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते असे चतुरस्त्र व्यक्तीमत्व असलेल्या कांतीलाल कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ‘विश्‍वाचे आर्त’ या त्यांच्या पाचव्या पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष तथा वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रास्ताविकातून कडू यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घोषित केला.

आता पूरग्रस्तांना मदतीची गरज आहेच. परंतु खरी गरज पूराचे पाणी ओसरल्यानंतर होणे गरजेचे आहे. काहींनी मदतीचे हात पुढे केले आहेत. तर ज्यांच्या घरात कोट्यवधीचा काळा पैसा पुरून ठेवला आहे, त्यांनीही निवडणूकीवर डोळा ठेवून मदतीसाठी अनेकांना हाक मारली आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील आमदार आणि खासदारांनी स्वतःहून पुढे येत एक गाव दत्तक घेण्याची गरज आहे. परंतु, तसे होताना दिसत नसल्याची खंत कडू यांनी व्यक्त करून सर्व काही सरकारवर सोपवून आपल्याला निदयीपणे वागता येत नाही, असे स्पष्ट केले.

कांतीलाल प्रतिष्ठान, पनवेल संघर्ष समिती आणि संघर्ष रिक्षा चालक मालक संघटनांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांगली, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्तांना आपण एक गाव दत्तक घेण्यासाठी विनंती पत्र पाठविले आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा करून ते देतील ते गाव सुजलाम् सुजफलाम करताना तेथील इन्फ्रास्ट्रक्चर, नियोजनबद्ध विकास, शाळा, छोटेसे मैदान, स्वच्छता गृहे, पडलेल्या घरांची दुरूस्ती, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाले, घरांची रंगरंगोटी, पथदिवे, अंतर्गत रस्ते, प्राथमिक आरोग्य सेवेची व्यवस्था, याशिवाय आदर्श गावांसाठी शासनाच्या अधिन राहून जे जे काही करावे लागेल ते त्या गावासाठी निश्‍चितपणे करण्याचा कडू यांनी मनोदय व्यक्त केला.

आपण गरीब आहोत, फकीर आहोत. आपल्याला कोल्हापूर किंवा सांगलीच्या लोकांकडून कसलीही अपेक्षा नाही. सरकारकडूनही नाही. परंतु, पूरग्रस्तांसाठी काही ठोस करण्याची आपली प्रामाणिक इच्छा असल्याने सरकार देईल ते गाव दत्तक घेऊन त्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आपल्याला गहाण राहावे लागले तरी त्याची पर्वा करणार नसल्याचे कडू यांनी सांगितले.

पुस्तक प्रकाशन आणि दहावी, बारावीच्या गुणवंतांच्या सत्कार समारंभासाठी फडके नाट्यगृह ओसंडून वाहत होता. शेकडो चाहत्यांनी नाट्यगृहाबाहेर उभे राहून कार्यक्रमाला मानवंदना दिली. 

यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी गंगाराम गवाणकर, प्रा. अशोक बागवे, माजी आमदार तथा रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील आदींच्या भाषणांतून हलक्या फुलक्या विनोदीधारा बरसल्या. त्यामुळे सभागृहात शिट्ट्या, टाळ्यांचा मुसळधार पाऊस कोसळत होता.

व्यासपिठावर माजी आ. विवेक पाटील, आ. बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, ऍड. गजानन पाटील, माजी नगरसेवक रमेश गुडेकर, पीआरपीचे प्रदेश सचिव नरेंद्र गायकवाड, कमळ पतसंस्थेचे सल्लागार शशिकांत बांदोडकर, निवृत्त शिक्षण उपसंचालक व्ही. एस. म्हात्रे, शेकाप नेते चंदरशेठ घरत, कॉंग्रेस नेते के. एस पाटील, महिला जिल्हाध्यक्ष श्रृती म्हात्रे, नगरसेवक अरविंद म्हात्रे, शिवसेना महानगर उपप्रमुख रामदास शेवाळे, शेकापचे जिल्हाचिटणीस गणेश कडू, आर. ड़ी. घरत, ज्येष्ठ नेते जनार्दन माळी, भिमसेन माळी, सुरेश फडके, सामाजिक कार्यकर्ती कुंदा गोळे, सुरदास गोवारी, सुनीत ठक्कर, उद्योजक विलास कोठारी, उत्तमराव गायकवाड, गझलकार आप्पा ठाकूर, ऍड. प्रफुल्ल म्हात्रे, हभप अरूणबुवा कारेकर, माधुरी गोसावी, सीमा पाटील, ऍड. प्रदीप इंगोळे, अस्मिता कांबळे, विजय काळे, विनूशेठ पोटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड, पनवेल संघर्ष समिती व संघर्ष रिक्षा-चालक मालक संघटनेचे पदाधिकारी अनुक्रमे मनोहर म्हात्रे, शैलेश गांगुर्डे, उज्वल पाटील, चंद्रकांत शिर्के, आनंद पाटील, प्रशांत गाला, मंगल भारवाड, सुरज म्हात्रे, स्वप्निल म्हात्रे, सचिन पाटील, कार्तिक पाटील, दर्शन ठोंबरे, महेंद्र विचारे, रामाश्री चौहान, गौरव पाटील, भावेश पाटील, राजेश म्हात्रे, संतोष सुतार, भाऊ घाटे आदींसह कार्यकर्त्यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

कार्यक्रमाचे उत्कृष्टशैलीत सुत्रसंचालन कांतीलाल प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अमित दवे यांनी केले.

अवश्य वाचा