महाड-दि.१३ ऑगस्ट 

ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरांमध्ये  झालेल्या ढगपुâटीमुळे या  परिसरांतील शेकडो एकर भातशेतीचे नुकसान  झाले असुन कोंझर पासुन अवघ्या तीन किलो मिटर  अंतरावर असलेल्या  कोंडरान  गावा जवळ  भुस्कलन  झाल्याने या गावांमध्ये भितीचे  वातावरण  निर्माण झाले आहे.त्याच बरोबर भात  शेतीचे देखिल नुकसान झाले आहे.अतिवृष्टी होऊन आठ दिवस झाले तरी  एकही अधिकारी या परिसरांमध्ये फिरकला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यांत येत आहे.

तालुक्यांतील किल्ले रायगडच्या परिसरांमध्ये ६ ऑगस्ट रोजी ढगपुâटी  झाली,त्या दिवशी चौवीस तास कोसळलेल्या पावसाची नोद ३८० मि.मि.नोद झाली.या अतिवृष्टीमुळे महाड शहरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते.त्याच वेळी किल्ले रायगडाच्या परिसरांमध्ये भुस्कलन होण्यास सुरवात झाली,कोंझर ते पाचाड दरम्यांत असलेल्या घाट मार्गावर देखिल भुस्कलन होण्यास सुरवात झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.कोंझर पासुन तीन किलो मिटर अंतरावर असलेल्या कोंडरान या गावा कडे जाणाNया मार्गा लगत असलेल्या भात शेतांमध्ये प्रचंड प्रमाणांमध्ये भुस्कलन झाल्याचे आढळून आले.जवळच डोंगर माथ्यावर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावांतुन येणारे पावसाचे पाणी आपला मार्ग बदलुन दुसNया मार्गाने येण्यास सुरवात झाल्याने भुस्कलना मध्ये अधिकच वाढ झाली.डोंगर माथ्या वरुन येणारे पाणी प्रचंड वेगाने येत असताना डोगरांतील माती दगड गोटे घेऊन येत होते आणि सर्व पाणी शेतांमध्ये जात असल्याने आज या शेतांत दिड ते दोन पुâट उंचीचा राब प्रत्येक शेता मध्ये असलेला दिसुन येतो.भविष्यां मध्ये येथील जमीनीचा वापर शेती करीता करणे अश्यक्य असल्याची माहिती कोंडरानच्या ग्रामस्थांनी दिली.

कोंझरचे ग्रामस्थ गणपत रघुनाथ पवार,संजय अंबाजी पवार,शंकर बाळू सकपाळ,बाबु घोलप,विजय मगर  यांची भात शेती कोंडरान परिसरांमध्ये असुन सर्व भात शेती नष्ट झाली आहे.वेगाने येणाNया पाण्या मुळे भात शेती वाहुन गेली आहे.शेता मध्ये आलेल्या चिखला मुळे शेता मध्ये पाय ठेवणे देखील अशक्य असल्याचे स्थानिक ग्रामस्थ अनत पवार यांनी सांगितले.त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला शेता मध्ये पाणी शिरण्यास सुरवात झाली त्याच वेळी रस्त्यावर पाच पुâट पाणी साचले होते असे नामदेव जाधव म्हणाले.मागच्या पंन्नास वर्षात अश्या प्रकारचा पुर आला नाही त्याच बरोबर पुराच्या पाण्याने भुस्कलन होण्याच्या घटना प्रथमच घडत असल्याचे पवार म्हणाले.राब बसलेल्या शेताची मशागत करणे आवाक्याच्या बाहेर असुन भविष्यांमध्ये भात शेती होईल असे वाटत नाही.या परिसरांमध्ये अतिवृष्टी होऊन आठ दिवस झाले अद्याप या भागांतील शेतीचे पंचनामे करण्यांत आले नसल्याचे गणपत पवार म्हणाले.

कोंझर परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भुस्कलन होत असताना शेतीचे नुकसान झाले.किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांना गेल्या कांही वर्षा पासुन भूस्कलनाचा धोका वाढलेला असल्याने शासनो भुवैज्ञानिक विभागा कडून तपासणी करणे आवश्यक आहे.दहा वर्षा पुर्वी हिरकणी वाडी मध्ये जमीन खचण्याची घटना घडली त्या नंतर कांही दिवसा पुर्वी पुनाडे गावा जवळ जमीनीला भेगा पडल्याचे दिसुन आले.दुर्दैवाने आज पर्यत एकही अधिकारी या परिसरांमध्ये पहाणी करण्या करीता आलेला नसल्याचे गणपत पवार यांनी सांगितले.

अवश्य वाचा

सारे काही पाण्यासाठी..,