मोहोपाडा

 जागतिक पर्यांवरण दिनाच्या निमित्ताने रसायनी येथील पिल्लई एचओसी काॅलेज आॅफ इंजीनिअरिंग  अॅंड टेक्नोलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालय आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने काॅलेज कॅन्टींग परीसरात "बायोक्रक्स"या पेट बाॅटल्स पुनसंस्करण यंत्राचा उदघाटन सोहळा मंगळवार दि.१३ रोजी दुपारी काॅलेजच्या कॅन्टीन आवारात संपन्न झाला.यावेली उपस्थित मान्यवरांचे डॉ.निवेदीता श्रेयांश  व यांनी स्वागत करुन आभार मानले. यानंतर पिल्लई कॅन्टीन परीसरात बायोक्रक्स या पेटवेस्ट यंत्राचे उदघाटन डाॅ.के.एम.वासुदेवन पिल्लई (सिईंओ), डॉ.प्रिअम पिल्लई (सिओओ),भरत मेहता(व्हाईंस प्रेसिडेंट रिलायन्स पाताळगंगा), डॉ.निवेदीता श्रेयांश (पिआर डायरेक्टर), राजीव कुमार (सिनीअर मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट),अजय मिश्रा(बायोक्रक्स प्रतिनिधी),डाॅ.लता मेनन(रसायनी पिल्लई प्रमुख) डॉ.मधुमती चटर्जी (प्राचार्य पिल्लई रसायनी) आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.असा उपक्रम वसाहतीत सुध्दा राबविण्यात यावा .ते आपले कर्तव्य नाही तर सामाजिक जबाबदारी असल्याचे मत भरत मेहता यांनी व्यक्त केले.तर राजीव कुमार म्हणाले की ही नवीन विद्यार्थ्यांची पिढी पुनसंस्करणाचे धडे इतरांपर्यंत पोचविण्यात जिगरीने प्रयत्न करेल.रसायनी पिल्लईत जिल्ह्यात पहीले बायोक्रक्स यंत्र बसविल्याचे डाॅ.निवेदीता श्रेयांश यांनी सांगितले.

 "बायोक्रक्स"ही पेटवेस्ट (पेट बाॅटल्स)यांचे सर्वबाजूंनी प्रक्रीया  उपकरणे बनवणारी भारतातील पहिलीच संशोधक कंपनी आहे.अत्यंत वैशिष्ट्य पुर्ण असे हे यंत्र रसायनी पिल्लई एचओसी काॅलेज आॅफ इंजीनिअरिंग अॅंड टेक्नोलॉजी या अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या परीसरात स्थापन केल्याने हा परीसर महाराष्ट्रातील सर्वप्रथम "पेट मुक्त काॅलेज परीसर"म्हणून ओळखला जाईल.पर्यांवरण बदलाच्या दृष्टीने बायोक्रक्स या यंत्राची स्थापना काॅलेज कॅटीग परीसरात करण्यात आल्याने सर्व प्लास्टीक बाॅटलवर क्रिया होवून त्यापासून कापडी कॅरी बॅग, पंजाबी ड्रेस वरील ओडणी,टि शर्ट ,पेन आदी वस्तूंची निर्मिती होणार आहे.शिवाय या मशिनमध्ये ठराविक प्लास्टीक बाॅटल्स टाकल्यावर आपल्याला त्याचा पैशाच्या स्वरुपात फायदा होतो.यावेली रसायनी पिल्लई काॅलेजच्याप्रमुख डाॅ.निवेदीता श्रेयांश,पोलिटेक्निकचे मुख्याध्यापक अमर मांगे,प्राचार्य मधुमिता चटर्जी आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा