आंबेत

    रायगड जिल्ह्यातील राजकारणात नेहमी चर्चेत असलेला म्हसळा तालुक्यातील आंबेत गाव हा नेहमीच श्रीवर्धन मतदार संघातील चर्चेचा विषय ठरत असतो आणि या गावापासून मिळणारी प्रेरणा हे नेहमीच विजयाकडे वाटचाल करणारी असते.या परिसरातील असलेला मुस्लीम समाजाचा मोठा वर्ग हा  नेहमी तटकरे कुटुंबाला मानणारा वर्ग समजला जायचा परंतु सध्या राज्यापासून गावापर्यंत राष्ट्रवादी पक्षाला लागलेली गळती आणि भर म्हणून लागलेला अंतर्गत वाद हे कुठेही थांबण्याचा नाव घेत नसून सदर मुस्लीम समाजाचा मोठा गट हा भाजपच्या अल्प्संख्यांक कार्यकर्ता श्री कमरुद्दीन मांडलेकर तसेच कुणबी समाजाचे मानले जाणारे नेतृत्व कृष्णा कोबनाक यांच्यावर विश्वास ठेऊन जणू काही आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच कमळ फुलण्याचे संकेत या चित्रावरून दिसून येत आहे.सदर राजकारणाची सुरु असलेली तटकरे कुटुंबाची घराणेशाहि संपुष्टात आणण्यासाठी अंतर्गत नेतेमंडली याला जबाबदार ठरत आहेत अस यावेळी तालुका युवक अध्यक्ष (चिटणीस)शादाब डावरे यांनी काल पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केल.

       म्हसळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका युवक चिटणीस शादाब डावरे आणि त्यांचे असंख्य मुस्लीम कार्यकर्ते अल्पसंख्याक कार्यकारणीवर विश्वास ठेऊन येत्या काही दिवसात भाजपच्या वाटेवर असून लवकरच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याच उघड होत आहे.शादाब डावरे यांना म्हसळा तालुका युवक चिटणीस पदावर नेमण्यात आल्यानंतर डावरे यांनी तरुणांना एकवटून मोठी तरुणांची फळी तयार केली होती परंतु ऐन संकटात असताना कोणत्याही राष्ट्रवादी नेत्याकडून किवा वरिष्ठ नेते मंडळींकडून सहकार्य उपलब्ध न झाल्याने शादाब डावरे हे लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याच स्पष्ठ उघड होत आहे.यामुळे आंबेत तसेच म्हसळा तालुक्यात भाजपला अच्छे दिन येणार हे मात्र नक्की.श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाची ताकद पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला जबर मोठा धक्का अल्प्संख्यांक कडून मिळू शकतो त्यामुळे मुस्लीम समाज येत्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला कौल देणार ते या अंतर्गत घडामोडी सुत्रांवरून समजेल.

अवश्य वाचा