रोहा

रोहा तालुक्यातील खांबेरे गावात डोंगराच्या पायथ्याशी स्वयंभू वैजनाथ मंदिर असून श्रावणी सोमवार या दिवशी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देत आ पंडीत पाटील यांनी भावनाताई पाटील यांच्यासह या शिवमंदिरात जाऊन अभिषेक केला.या पूजेचे पौरोहित्य राजेंद्र जंगम महाराज यांनी केले.

या पुरातन मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम वेगाने सुरू असून मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन याप्रसंगी आ पंडित पाटील यांनी दिले आहे.स्थानिक ग्रामपंचायत सदस्य बबन पडवळ तसेच खांबेरे ग्रामस्थ मंडळ यांनी या पूजेसाठी विशेष तयारी केली होती.या कार्यक्रमाला खांबेरे सरपंच गिता वारगुडा, उपसरपंच जयश्री जोशी,जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी,हेमंत ठाकूर,परशुराम वाघमारे, ग्राप सदस्य दिप्ती गिजे,आत्माराम कासार,विनायक धामणे तसेच तालुक्यातील पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच खांबेरे ,टेमघर,डिंगणवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदारांनी परिसरात झालेल्या शेतीच्या नुकसानीची स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली.तसेच अतिवृष्टीमुळे भात शेतीला गेलेल्या खांडी याची पाहणी करून शेतकऱ्यांना गणपती सणापूर्वी नुकसान भरपाई देण्याचे आदेश तहसीलदार रोहा यांना दिले आहेत.तसेच मंदिराच्या उभारणी नंतर मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता करून देणार असल्याचे आ पाटील यांनी जाहीर केल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आमदार महोदयांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे.

अवश्य वाचा