दांडगुरी,13 आगस्ट 

देशात दक्षिण काशी म्हणून हरिहरेश्वर देवस्थानाची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचा इतिहास असणाऱ्या या तीर्थक्षेत्राचे महात्म्य मोठे आहे. इथल्या पर्यटकांची संख्या अधिक आहे, ती वाढावी यासाठी प्रयत्न आपण करणार असल्याची माहिती रायगड मतदान संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. ते श्रावणी सोमवार (ता -12) निमित्ताने त्यांनी हरिहरेश्वर भेटीदरम्यान बोलताना सांगितले.ते पूढे म्हणाले की, केंद्र शासनांच्या योजनांतर्गत इथल्या समुद्रकिनाऱ्याचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करू. तसेच स्कायवाॅकसाठी आराखडा तयार करू. इथल्या प्राचीन मंदिराचे पुनरूज्जीवन करावे अशी भावना जनसामान्यात आहे. त्यासाठीही आपण प्रयत्न करू. यावेळी श्रावणी सोमवारच्या निमित्ताने श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे शिवशंभो महादेवाला खा तटकरे यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला.  खासदार होऊन पहिल्यांदा च  देवस्थानाकडून यावेळी तटकरे यांना  भेट देण्यात आली. तसेच, ग्रामपंचायतीकडून सत्कारही करण्यात आला.  खासदार निधीतून नवीन हरिहरेश्वर ग्रामपंचायत कार्यालयाचे काम प्रथम पूर्ण करू, असे आश्वासन इथे बोलताना दिले.श्रीवर्धन शहरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन, उद्घाटन तसेच लोकार्पण केले. येथील कार्यक्रमात बोलतांना त्यांनी सांगितले की,  इथल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मताधिक्य देऊन मला देशाच्या संसदेत रायगड-रत्नागिरीचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी पाठवले आहे. त्याबद्दल मी या सर्वांचा आभारी आहे. इथल्या गावांची नावं आज देशाच्या संसदेत मी घेऊ शकतो, याचा मला अभिमान आहे.आयार मोहल्ला येथील कब्रस्तानची कंपाऊंड वॉलचे लोकार्पण, पेशवे आळी ते दादर पूल येथील पर्ह्याच्या बांधकामाचे भूमिपूजन, इंदिरानगर तसेच मठाचा गवंड येथील स्मशानभूमीच्या सुशोभिकरणाचे लोकार्पण, जीवना रस्त्यावरील आईस फॅक्टरी जवळील पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन, गणेश आळी ते जीवना रोडपर्यंतच्या बांधकामाचे भूमिपूजन, तसेच श्रीवर्धन नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तरांचे वाटप इत्यादी कार्यक्रम खासदार तटकरे यांच्या उपस्थितीत झाले.व्यसपीठावर नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने, बाळा सातनाक,लालाभाई जोशी, नगरसेवक वसंत यादव, अनंत गुरव, उदय बापट, भावेश मांजरेकर,उप अध्यक्ष सुचिन किर,शिस्ते सरपंच चंद्रकांत चाळके,रमेश घरत, डॉ अबू राऊत, राजू भोसले, गणेश पोलेकर, व तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी तटकरे यांनी सांगितले पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी भवन, वाचनालय यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले. ज्येष्ठ नागरिकांकरिता श्रवणयंत्रांसाठी केंद्र सरकारची योजना राबवणार. तसेच, केंद्र सरकारच्या योजनेतील रायगड जिल्ह्यातील पहिलंच आयुष हॉस्पिटल श्रीवर्धन येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, याची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.

 

अवश्य वाचा