तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात परिवर्तन आणले आहे. तंत्रज्ञानाचे परिणाम दूरगामी, परिवर्तनात्मक होतात. तंत्रज्ञानाने परंपरेला छेद दिला आहे आणि आपल्या सर्व गोष्टींमध्ये बदल आणले आहेतच, शिवाय आपण त्या कशा प्रकारे करतो त्यामध्येही परिवर्तन आणले आहे.

विचार करा – जगातील सर्वात मोठ्या वाहतूक सुविधा देणाऱ्या कंपनीच्या मालकीची एकही कार नाही. जगातील सर्वात मोठ्या ‘हॉटेल चेन’कडे एकहा हॉटेल नाही. स्वायत्त कारचे मालक म्हणून गुगल व अॅपल हे एक दिवस जगातील सर्वात मोठ्या कारउत्पादकांशी स्पर्धा करू शकतात.

तंत्रज्ञानामुळे भारतीय शेतीवरही अशाच प्रकारे परिवर्तनात्मक परिणाम घडू शकतो.

मी वर नमूद केलेल्या उदाहरणांमध्ये उल्लेख केलेल्या कंपन्यांचे बिझनेस मॉडेल तंत्रज्ञानावर आधारित आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर फार केला जात नाही. असे असले तरीही, तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे पूर्णतः नवी क्रांती आणण्यासाठी आणि उत्पादकता व भरभराट यांचे युग आणण्यासाठी मोठी चालना मिळू शकते.

आजची एकंदर स्थिती पाहता, भारतातील 60 टक्के लोकसंख्या रोजगारासाठी शेतीवर व शेतीशी संबंधित उपक्रमांवर अवलंबून आहे. परंतु, देशातील 80 टक्क्यांहून अधिक शेतकरी लहान व किरकोळ शेतकरी आहेत आणि त्यांच्या शेताचा आकार दोन हेक्टरपेक्षा कमी आहे.

शेतीचे स्वरूप विखुरलेले असल्याने त्यांच्याकडे उत्पादन आधुनिक करण्यासाठी व प्रक्रिया तंत्रज्ञान आधुनिक करण्यासाठी, तसेच, बियाणे व खते अशा उच्च उत्पादन मिळवून देणाऱ्या प्रकारांची खरेदी करण्यासाठी पैशांचे पाठबळ नाही. हे दुष्टचक्र कमी उत्पादकता व कमी उत्पन्न यासाठी कारणीभूत आहे.

 

 

 

वाहतुकीसाठी व साठवणूक वितरण यासाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा असल्याने या क्षेत्रातील क्लिष्टता वाढली आहे. या सर्वांचा परिणाम शेती उत्पादनावर होते आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे मूल्य कमी होते.

 

 

 

तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास हे दुष्टचक्र भेदले जाऊ शकते. भारतातील शेतीतील क्षमता आजमावता येऊ शकते, तसेच देशाच्या शेतकऱ्यांसाठी भरभराट साधता येऊ शकते. अनेक मार्गांनी हे घडते आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या प्रमाणामुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधी खुल्या होत आहेत. मोबाइल फोनच्या वापरात वाढ झाल्याने शेतकरी-प्रणित अॅपच्या विकासालाही चालना मिळते आहे. हे अॅप शेतकऱ्यांना रिअल-टाइम माहिती पुरवते, जसे हवामानाची माहिती, अंदाज, बाजारभाव, इ. तसेच, त्याच वेळी त्यांना एकमेकांशी संवाद साधणे आणि शेतीतून निर्यात करणे शक्य होते. विश्वासार्ह व सक्षम व्यवस्था निर्माण करता येऊ शकतो. या सुविधांमुळे शेतकऱ्यांना आवश्यक ज्ञान दिले जाते. यामुळे त्यांना चांगला दर मिळण्यास आणि शेती व उत्पादन याकडे अधिक कार्यक्षमपणे पाहण्यास मदत होते.

 

 

 

आणखी एक तंत्रज्ञान-प्रणित उपक्रम म्हणजे, ट्रॅक्टर व फार्म इक्विपमेंट रेंटल सेवा. ही सेवा शेतकरी समुदायामध्ये उत्तम प्रतिसाद मिळवत आहे. शेतकऱ्याला ट्रॅक्टर/शेती उपकरणाची आवश्यकता असेल तर या वस्तू खरेदी करण्यासाठी मोलाचे भांडवल अडकवून ठेवण्याऐवजी या वस्तू भाड्याने घेता येऊ शकतात. यामुळे शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे सावकाश, पण स्थिरपणे योगदान मिळत असून त्यातून शेतकऱ्यांचे एकंदर उत्पादन व आउटपुट यामध्ये वाढ होणार आहे.

 

शेतीतील उत्पादकता सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ही केवळ दोन उदाहरणे आहेत. परंतु, ही केवळ सुरुवात आहे आणि पृष्ठभागाची केवळ झलक आहे.

 

 

 

उदाहरणार्थ, कल्पना करा, शेतीवर फिरणारे ड्रोन माहिती गोळा करत आहेत, सॅटेलाइट पिकाखालील क्षेत्र मोजत आहेत, ‘स्मार्ट’ शेती उपकरणे हवामानाचा अंदाज घेत आहेत, मातीची स्थिती तपासत आहेत आणि विशिष्ट पिकाला आवश्यक असणारे पाण्याचे प्रमाण तपासत आहेत.

 

 

 

प्रिसिजन महत्त्वाचे ठरणार असून त्यामुळे कार्यक्षमता वाढेल, खर्च कमी करत असताना आउटपुट वाढेल. मोबाइल-आधारित अॅप्लिकेशनमुळे रेट टेप कमी होईल, मध्यस्थ नाहीसे होतील आणि पुरवठा साखळी आखूड होईल. निरर्थक खर्च नाहीसे केले जातील. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य व पूर्ण दर मिळेल, तसेच ग्राहकांसाठी उत्पादनाच्या किमती कमी होतील.

 

 

 

आम्ही यास परिवर्तन आणणारे फार्मिंग 3.0 म्हणतो आणि ते घडू लागले आहे. या नव्या वेधक टप्प्यामध्ये, भारत नावीन्यपूर्ण फार्मिंगकडे सक्रिय वाटचाल करत आहे. ग्राहकांना व शेतकऱ्यांना मध्यस्थाविना सेवा देऊन, सरकार आणि खासगी क्षेत्र कार्यक्षमता अवलंबण्यासाठी या परिवर्तनाचा लाभ घेत आहेत. अनेक तरुण उद्योजक स्टार्ट-अपच्या व अत्याधुनिक कल्पनांच्या माध्यमातून पुढे येत आहेत, काम करण्याच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान देत आहेत. 

 

 

 

या टप्प्यामध्ये नावीन्य, डिजिटल सुविधा व प्रीसिजन शेती अधिक महत्त्वपूर्ण आहेत व त्यामुळे या क्षेत्राला ‘लोक’, ‘प्रक्रिया’ व ‘तंत्रज्ञान’ ही सध्याची आव्हाने पेलण्यासाठी मदत होईल.

 

शेतकऱ्यांचे कर्ज, इनपुट, सल्लासेवा किंवा मार्केट लिंकेज या बाबतीत अनौपचारिक व असंघटित घटकांवरील अवलंबित्व कमी करणे, हे उद्दिष्ट असणाऱ्या, तंत्रज्ञानाचा समावेश असणाऱ्या सोल्यूशनमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्ताचे ठरणार आहे.

अवश्य वाचा