आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पोलादपूर पंचायत समिती मध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाई आस्वाद शेठ  आगमन झाले,त्यानंतर पंचायत समिती सभागृहामध्ये,जिल्हा परिषद सदस्या सुमनताई कुंभार मॅडम, सभापती दीपिका ताई दरेकर मॅडम,उपसभापती शैलेश शेठ सला गरे,विविध खात्यांचे अधिकारी ,शेकाप तालुका चिटणीस,भाई एकनाथ गायकवाड,भाई वैभव चांद,चंद्रकांत सणस,निवृत्ती उतेकर,भाई अजित कंक,मनोहर पार्ट, बापू जाधव,उपस्थित होते.

     साहेबांनी संपूर्ण  तालुक्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला,रस्ते,विहिरी,पाणी पाईप लाईन,अश्या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून काम करून घेण्याच्या सूचना संबंधित खात्याला दिल्या.त्यानंतर पंचायत समितीच्या प्रांगणात  पत्रकार परिषद घेऊन, पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील कोतवाल येथे खचलेला रस्ता पाहण्यासाठी गेले,परसुळे रस्त्यामर्गे कोतवाल येथे जाऊन संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. व तत्काळ संबंधित बांधकाम विभागाच्या आधिकर्याना सूचना दिल्यात त्या रस्त्याला पर्यायी रस्ता बांधण्याची सूचना देऊन ताबडतोब काम चालू करण्यास सांगितले.

    नंतर महाड तालुक्यामधील भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.

 

अवश्य वाचा