उरण

    उरण नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष चषक २०१९ जलतरण स्पर्धेत आर्यन मोडखरकर याने पाच स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे.या यशाबद्दल आर्यनवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उरण नगरपालिकेने जलतरण स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आर्यन मोडखरकर याने ५० मी. बॅक्स्ट्रोक मध्ये प्रथम, ५० मी. फ्रीस्टाइल द्वितीय, ५० मी. बॅटरफ्लाय द्वितीय तर ५०-४ फ्रिस्टाईल रिले मध्ये प्रथम तसेच ५०-४ मिडले रिले या सांघिक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. 

    यापूर्वी ही अनेक स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. तसेच नुकत्याच उरण नगरपालिका जलतरण स्पर्धेत ५ विजेतेपद मिळविल्याबद्दल आर्यनचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अवश्य वाचा