रोहा अष्टमी 

      विद्यार्थी दशेत असताना शिक्षणाबरोबर खेळालाही तितकेच महत्व दिले पाहिजे. शालेय जीवनातील खेळ हा आपल्या जीवनाला कलाटणी देणारा असतो. कोणताही खेळ खेळताना विद्यार्थ्यांने संयम बाळगणे आवश्यक असते. तरच आपला विजय हमखास होतो असे विधान शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष वसंत मार्गे यानी केले. भालगाव हायस्कूल मध्ये रोहा तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

     यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन प्रदिप शंकर कदम, माजी अध्यक्ष वसंत मार्गे, खजिनदार विठठल खारस, मुख्याध्यापिका सुनिता मोंड़े , सदस्य अशोक आंबारले, प्रदिप दामुगडे,  क्रिडा शिक्षक मिनानाथ गावंड, रविंद्र कान्हेकर, सुधिर जंगम, आदी उपस्थित होते. स्पर्धेत 14 वर्षा खालिल 8 मुले, 17 वर्षां खालिल 9, 19 वर्षां खालिल 6 मुले आदी संघ सहभागी झाले होते. यामध्ये 14 वर्ष वयोगट मुलांमध्ये सानेगरुजी  हायस्कूल व आश्रम शाळा सानेगाव यांच्या अटीतटीच्या लढतीत सानेगाव विद्यानीकेतन हायस्कूल 1 गुनानी प्रथम आले आहे तर आश्रम शाळा सानेगाव द्वितिय आले आहे. 17 वर्ष वयोगटात सानेगुरुजी विद्यानीकेतन व मेहंदळे हायस्कूल यांच्या अटीतटीच्या सामन्यात सानेगुरुजी विद्यानीकेतन हायस्कूल प्रथम तर को.ए.सो.मेहंदळे हायस्कूल द्वितीय आणि 19 वर्ष वयोगटात को.ए.सो.मेहंदळे हायस्कूल व आश्रम शाळा सानेगावच्या अटीतटीच्या सामन्यात को.ए.सो मेहंदळे ज्यूनियर कॉलेज रोहा प्रथम तर आश्रम शाळा सानेगाव द्वितीय आले आहेत. विजयी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !