महाड-दि.१२ ऑगस्ट 

महाड तालुक्यांमध्ये पुरा मुळे मोठ्या प्रमाणांमध्ये वित्त हानी झाली असुन सर्व सामान्य नागरिकांचे देखिल प्रचंड नुकसान झाले.१ ऑगस्ट पासुन सलग सहा दिवस पुराचे पाणी तालुक्यांतील भातशेतांमध्ये होते. मंगळवारी आलेल्या पुराच्या पाण्या मुळे भाताची रोपे पुर्णपणे कुजून गेल्याने शेतकरी हवालदील झाला असुन बहूतांशी शेती पुराच्या पाण्याने उध्वस्त झाली असल्यामुळे शासनाने नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करावेंत त्याच बरोबर प्रतिहेक्टरी पंन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यांत यावी अशी मागणी शेतकरी संघटनां कडून करण्यांत आली आहे.

महाड तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यांतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आणि नद्याच्या किनाNयावर असलेल्या भातशेतांमध्ये पुराचे पाणी शिरले.अनेक गावे पाण्या खाली गेल्याने संपर्वâ देखिल राहीला नाही.नदीतील  पाण्याच्या प्रवाहा मध्ये आलेला कचरा शेता मध्ये गेल्याने पुराचे पाणी गेल्या नंतर कचरा  मात्र शेतातच राहीला.त्याच बरोबर सखल भागांतील शेतांमध्ये पुराचे पाणी सलग सहा ते आठ दिवस साचुन राहील्याने भातशेती पुर्णपणे कुजून गेली आहे.मंगळवारी आलेल्या पुरामुळे शेतीचे अधिक नुकसान झाले.किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावांना अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला.या विभागांतील नाते, काचले,कोळोसे, वरंडोली, खर्डी, चापगाव,कोंझर या गावासह वाघेरी, वाळण, मांघरुण, आसनपोई, आकले, कोल, कोथेरी, वडवली, राजेवाडी, कोंडीवते,भोगाव तसेच खाडी विभागांतील दासगाव, वहूर, वेंâबुर्ली, जुई,तुडील,चिंभावे,वलंग इत्यादी गावांना पुराचा फटका बसल्याने या परिसरांतील भातशेती पुर्णपणे नष्ट झाली असल्याने शेतकNयांचे प्र्रचंड नुकसान झाले असुन तालुक्यांतील शेतकNयांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे.

शहरांमध्ये जरी मंगळवारी पुराचे पाणी शिरले असले तरी या पुर्वी आठ दिवस महाडकरांना पुराचे पाणी हुलकावणी देत होते.सलग आठ दिवस सकाळ संध्याकाळ सावित्री नदीचे पाणी शहराच्या सखल भागांमध्ये शिरत होते.महाडकर सावध असुनही मंगळवारी अचानक पुराच्या पाण्याने शहरांत थैमान घातले आणि होत्याचे नव्हते केले.शहराच्या परिसरांत सखल भागांत शेकडो एकर भात शेती आजही केली जाते.सावित्री,काळ आणि गांधारी नद्यांच्या किनाNयावर असलेल्या भातशेतीला दरवर्षी पुराच्या पाण्याने नुकसान होत असल्याने अनेक शेतकरी शेती उद्योगा पासुन दुर झाले आहेंत.याला कारण भात शेतीचे नुकसान झाले तरी शासना कडून एकही रुपयाचा नुकसान भरपाई दिली जात नाही.या वर्षी पावसाने उशीरा सुरवात केल्याने लावणीची कामे देखिल उशीरा झाली.त्या नंतर अचानक पावसाला सुरवात झाली,ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखे पासुन पावसाचा जोर सर्वत्र वाढल्याने नद्याना पुर आला आणि सलग दहा ते बारा दिवस शहराच्या सखल भागांमध्ये पुराचे पाणी साचुन राहीले.पाण्या मुळे अनेकांची शेती वाहून गेली तर कांही शेता मध्ये अन्य ठिकाणाहून वाहून आलेला रेजगा साठला आहे.तर कांही शेतांमध्ये प्रचंड स्वरुपांमध्ये कचरा साठला आहे.पुरा मुळे शेतीची हानी मोठ्या प्रमाणांमध्ये झाल्या मुळे शासनाने त्वरीत मदत करावी अशी मागणी केली जात असताना प्रति हेक्टरी किमान पंन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यांत यावी अशी मागणी तालुक्यांतील विविध शेतकरी संघटनां   कडून करण्यांत येत आहे.

अवश्य वाचा