कर्जत - दि.12 

            कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील डिकसळ गावातील शिवसेनेचा प्रभावी युवा कार्यकर्ता तेजस भासे यांनी शिवबंधन तोडून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे.

             कर्जत विधानसभा मतदार संघातील आमदार सुरेश लाड यांच्या कार्यप्रणाली व कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून डिकसळ गावातील शिवसेनेचा कडवा कार्यकर्ता तेजस भासे यांनी आज दि.12 ऑगस्ट रोजी दहीवली येथील राष्ट्रवादी भवन मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. आमदार सुरेश लाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण, तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, महिला प्रदेश सरचिटणीस हिरा दुबे, अल्पसंख्याक विभागाचे दिलीप गायकवाड, कर्जत विधानसभा युवा महिला संघटक प्रतिक्षा लाड, राष्ट्रवादी युवक कॉग्रेस तालुकाध्यक्ष सागर शेळके, माथाडी नेते शिवाजी दातीर,शहर अध्यक्ष नंदकुमार लाड, कर्जत नगरपरिषद गटनेते शरद लाड, माजी नगराध्यक्ष राजेश लाड उपस्थित होते.

               आमदार सुरेश लाड यांनी उमरोली ग्रामपंचायत रेल्वे पट्ट्यातील महत्वाची ग्रापंचायत आहे, तेजस भासे यांच्या प्रवेशामुळे ही ग्रामपंचायत या निववडणुकीत नक्कीच राष्ट्रवादीच्या ताब्यात येईल असे सांगितले. यावेळी तानाजी चव्हाण, अशोक भोपतराव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संदीप पाटील, देविदास सावंत, अनंता पाटील, प्रवीण ठाकरे, योगेश थोरवे, कमलाकर पाटील, गिरीश भासे, योगेश राऊत, भास्कर लोंगले, दीपक पाटील, अमर पाटील, सचिन गायकर, ऋषिकेश भगत, गुरुनाथ पाटील, दशरथ लोंगले आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अवश्य वाचा