पोलादपूर 

तालुक्यातील कोतवाल खुर्द- रेववाडी रस्त्याला तातडीने निधी देणार असल्याची ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती ऍड.आस्वाद पाटील यांनी येथे दिली.

पोलादपूर पंचायत समिती कार्यालयाच्या बॅ.नाथ पै सभागृहामध्ये राजिप उपाध्यक्ष ऍड. आस्वाद पाटील आणि  हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी रविवारी भेट दिली आणि पोलादपूर तालुक्यातील रस्ते आणि सुविधांबाबत आस्थापूर्वक चौकशी केली. यावेळी ऍड.पाटील यांच्यासह राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, राजिप सदस्या सुमन कुंभार, सभापती दिपिका दरेकर, उपसभापती शैलेश सलागरे, रायगड जिल्हा बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड, शेकापक्ष पोलादपूर तालुकाचिटणीस वैभव चांदे, पुरोगामी चिटणीस चंद्रकांत सणस, महेश दरेकर, नामदेव शिंदे, अविनाश शिंदे, राजू महाडिक, प्रवीण महाडिक, सिध्देश महाडिक, रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच कोतवाल खुर्द येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष  ऍड.आस्वाद पाटील यांनी कोतवाल खुर्द येथे रस्ता वाहून गेलेल्या ठिकाणाची पाहणी करून या गावातील सर्व वाडयांचे दळणवळण पुर्ण ठप्प झाले आहे असल्याची पाहणी करीत जवळजवळ 70 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची दखल घेतली आणि या रस्त्याला पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी ताबडतोब निधी मंजूर करण्याचे कबूल करून येत्या चार-पाच दिवसात काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

अवश्य वाचा