खांब-रोहे,दि.१२

      रोहे तालुक्यातील नडवली गावचे सुपुत्र तथा समाजसेवक शांताराम भोसले यांनी आपल्या रक्तदानाचा सिलसिला कायम राखला असून नुकतेच त्यांनी ५५ वे रक्तदान करून एक अनोखा विक्रमच केला आहे.

       शांताराम भोसले यांनी श्री.संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरखैरणे येथे संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात ५५ वे रकतदान करून आपल्या नडवली गावाचेही नाव रोशन केले आहे.तर कोपर खैरणे येथे त्यांना  वधूवर सूचक मंडळाचे डॉ.प्रतिक तांबे, सौ.प्रियंका शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तरशिवसह्याद्रीचे जनक ज्ञानेश्वर भाईसाहेब लांगडे यांच्या पासून रक्तदानाच्या पवित्र कार्यास प्रेरणा मिळाली असल्याचे ते आवर्जून उल्लेख करतात.

         रक्तदान म्हणजे प्राणदान,रक्तदान म्हणजे जीवनदान.शांताराम भोसले यांना शालेय जीवनापासूनच रक्तदान करण्याची प्रेरणा मिळाली व त्या प्रेरणेतून त्यांनी विविध सामाजिक व स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने पार पडलेल्या रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने जाऊन रक्तदान केले आहे. आज त्यांनी वयाची पार करुन देखील ते निरोगी व निरामय आयुष्य जगत आहेत.त्यांनी आतापर्यंत रक्तदानाच्या पवित्र कार्यात केलेल्या कामगिरीबद्दल विविध ठिकाणी त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. तर ठिकठिकाणी ते रक्तदानाबाबत प्रचार व प्रसार करीत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय प्रा.शिक्षक किशोर जाधव यांनी त्यांच्याबाबत अधिक माहिती देताना सांगितले.

अवश्य वाचा