पाली दि 11 ऑगस्ट 19

शालेय क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. कोणताही खेळ निवडात्याच्या अंतिम ध्येयासाठी चिकाटीने खेळाखूप सराव व साधना केली तर यश तुमचेच आहे. शालेय क्रीडा स्पर्धांमधून तालुकाजिल्हाविभागीय आणि राज्यस्तरीय असे टप्पे पार करत भावी गुणवंत खेळाडू निर्माण होत असतात असे मत सुधागडचे तहसिलदार दिलीप रायनांवर यांनी सुधागड तालुका स्तरीय खो खो च्या क्रीडा सामन्यांच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले

जीवनामध्ये खेळला अनन्य साधारण महत्व असून संस्कृतीपरंपराआनंदी व उस्ताही वातावरण निर्माण करण्यासाठी खेळातील सक्रीय सहभाग आवश्यक आहे. शालेय जीवनात विद्यार्थी खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सुधागड तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. जांभुळपाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिर मध्ये तालुकास्तरीय मुले आणि मुलींच्या खो खो चे सामन्यांचे उदघाटन तहसिलदार दिलीप रायनांवर यांच्या हस्ते झाले यावेळी प्राचार्य माणिक धर्माधिकारीक्रीडा व्यवस्थापक बापू जगताप तर पंच म्हणून संभाजी ढोपेराजू पिंजारी, टी.डी.कदम, सुभाष कदम, तृप्ती साने, विश्वास ढोपे, पर्यवेक्षक के.डी. पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मागील वर्षी विभागीय स्तरावर खेळलेल्या संत नामदेव हायस्कूल चा विद्यार्थी कुणाल मोहिते याचे अभिनंदन तहसिलदार दिलीप रायनांवर यांच्या हस्ते करण्यात आले.

अलीकडच्या काळात खेळाला फार महत्व प्राप्त झाले आहे. खेळाडूंना शिक्षणासाठी प्रवेश आणि नोकरी मध्ये आरक्षण सुद्धा शासनाने दिलेले आहे. मी सुद्धा राज्यस्तरीय पोहण्याच्या स्पर्धेतील एक खेळाडु आहे. असे सांगून तहसिलदार दिलीप रायनांवर म्हणाले की निसर्गाने प्रत्येक मुलांमध्ये क्षमता दिली आहे. तुमच्या मधील क्षमता तुम्ही ओळखली पाहिजे. त्या क्षमतेला अंतिम टप्प्यापर्यन्त नेण्यासाठी खूप मेहनतसराव व चिकाटी आवश्यक आहे. खेळामुळे शरीराचा व्यायाम होत असतो व त्यामुळे आरोग्य सुदृढ राहते म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने खेळात भाग घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले

अवश्य वाचा