नेरळ

देशाचे भावी क्रीडापटू घडवण्यासाठी शालेय  जीवनापासूनच विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते अशाच प्रकारे रायगड जिल्हा परिषदेच्या बेकरे केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांसाठी बेकरे येथे पावसाळी क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्रीडा स्पर्धा कबड्डी, खो-खो, धावणे, रीले, लांब उडी, उंच उडी, हॉलीबॉल, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक अशा अनेक
क्रीडा स्पर्धा पार पडल्या. 

7 ते 9 ऑगस्य रोजी या स्पर्धांचे आयोजन बेकरे शाळेत करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन माणगाव ग्रामपंचायतचे सदस्य जयेंद्र कराळे आणि जयवंत हाबळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी कराळे बेकरे केंद्राचे केंद्रप्रमुख शरद म्हसे, सुरेश चव्हाण शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश जामघरे तालुका क्रिडा समन्वयक किशोर पाटील संदेश कराळे, रामचंद्र कराळे यांच्या त्यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा खेळण्यासाठी प्रचंड उत्साह जाणवत होता. 

या स्पर्धांमध्ये मुंलांच्या कबड्डी प्रथम क्रमांक माणगाव शाळा, द्वितीय क्रमांक आंबिवली शाळा, मुलींच्या कबड्डी प्रथम क्रमांक एकसल शाळा, तृतीय क्रमांक माणगाव शाळेने पटकावला. तसेच मुलांच्या खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक माणगाव,  द्वितीय क्रमांक अंबिवली तर मुलींच्या खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक माणगाव व दुतिय क्रमांक बेकरे या शाळेचा आला सर्व स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा आकर्षक ट्रॉफि देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच कर्जत तालुका प्राथमिक शाळा यामध्ये लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्ताने वाचन स्पर्धा नेरळ येथे घेण्यात आले त्यामध्ये बेकरे शाळेतील कु वृषाली दत्तात्रेय कराळे हिने ४५० विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक काढला तिचे सुद्धा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आले. या परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


अवश्य वाचा