उरण

जेएनपीटीने येथील प्रकल्पग्रस्तांची घोर फसवणूक केली आहे. त्या विरोधात अनेकवेळा निदर्शने आंदोलने करूनही पदरात काहीच पडले नाही. त्याच्या विरोधात आरपारची लढाई म्हणूनच  आमरण उपोषण सुरू केले असल्याचे  सरपंच निशांत घरत यांनी सांगितले.

1984 पासुन जेएनपीटी प्रकल्पाची हालचाल सुरु झाल्यापासुन या प्रकल्पासाठी प्रकल्पग्रस्त गावांची इच्छा नसताना बळजबरीने जमीन संपादित केली आणि यावेळी आपल्या येथे जमीन संपादित करीत असतांना जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना प्रशासनाने 12.5% जमीन देण्याचे मान्य केले होते.  असा कायदा हा देशात जेएनपीटी पासून सुरुवात करण्यात आला.  परंतु 12.5% भूखंड जेएनपीटी प्रकल्पग्रस्त लोकांना न देता देशात अनेक ठिकाणी 12.5% जमीन देण्यात आली. तसेच जेएनपीटी बंदरासाठी 1986 साली राज्य सरकारने शेवा व हनुमान कोळीवाडा या दोन गावांना विस्तापित केले होते. यापैकी हनुमान कोळीवाडा या गावाला गाव स्थापनेपासुन वाळवी लागली होती, तेव्हा पासुन नव्याने पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थ करीत होते. त्यासाठी राज्य सरकार,केंद्र सरकार यांच्या बरोबरच राष्ट्रपतींकडेही मागणी केली होती. तरीदेखील आमची समस्या आजही सुटलेली नाही. त्यामुळे नवीन शेवा गावचे सरपंच निशांत घरत यांनी जेएनपीटी प्रशासनाच्या गेट समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. सुरु असलेल्या आमरण उपोषण स्थळी उरण तालुक्यातील मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थिती दर्शवून उपोषणास पाठिंबा दिला आहे.त्यामुळे विस्तापीत प्रकल्पग्रस्तांच्यात जेएनपीटी प्रशासना विरोधात तिव्र संताप पसरलेला आहे.

जेएनपीटी आणि त्यांच्या अंतर्गत कार्यान्वीत असलेल्या प्रकल्पांमध्ये(कंपन्या) नोकरीची भरती करीत असतांना स्थानिक तरुण,तरुणींना प्रथम प्राधान्य दिले पाहीजे असतांना त्याऐवजी जेएनपीटी प्रशासन या नोकरभारतीत परप्रांतीयांना संधी देत आहे. या शिवाय नोकर भरतीपुर्वी घेतली जाणारी परिक्षा ही पारदर्शक पद्धतीने व्हायला हवी.

जेएनपीटीने प्रकल्पग्रस्तांना आद्याप पर्यंत 12.5% भूखंड का वाटप केले नाही ? प्रलंबीत 12.5% चा प्रश्नही तातडीने सोडवा.ज्यां ज्या प्रकल्पग्रस्थ नागरीकांना नोकरी नसेल त्यांना उद्योग धंदा मिळवून देण्यासाठी जेएनपीटीने प्राध्यान्याने पुढाकार घ्यावा. अन्यथा संघर्ष तिव्र करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत असा विडाच जनू सरपंच निशांत घरत आणि त्यांच्या पाठीराख्यांनी उचलला आहे.

या संघर्षात्मक लढ्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी सहभाग घेतला आहे त्यांचे मी आभारी आहे.जो पर्यंत आमच्या हक्काच्या मागण्या प्रशासन मान्य करित नाही किंबहुना त्या प्रत्ययात येत नाही तो पर्यंत मी हे उपोषण असेच सुरु ठेवणार आहे.प्रत्तेक वेळी फक्त या प्रशासनांनी आश्वानां पलीकडे काहीही दिले नाही.  जेएनपीटी प्रशासनाचे आधिकार्‍यांनी योग्य ती यशस्वी चर्चा करुन,आमच्या मागाण्यांची पुर्तता करावी.अन्यथा तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार उपोषण कर्ता सरपंच निशांत घरत यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

अवश्य वाचा