माणगांव 

     माणगांव तालुक्याच्या मोर्बा विभागातील  देगावच्या सरपंचासह निळगूण आदिवासी वाडीतील ग्रामस्थांचे दोन दिवसांपूर्वी पेण येथे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या पक्षीय बैठकीमध्ये आ. प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सदर ग्रामस्थांनी भाजप कार्यकर्त्यांच्या आमिषाला बळी पडून शेकाप मधून भारतीय जनता पार्टीत आपल्या असंख्य कार्यकर्यांसह पक्ष प्रवेश केला होता. या प्रवेशकर्त्यां मध्ये देगाव सरपंच बबिता काटकर सह निळगूण आदिवासी वाडीतील ग्रामस्थांची भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला होता. 

       परंतु प्रवेशकर्त्या शेकापच्या कार्यकर्त्यांची झालेली दिशाभूल त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी केवळ दोनच दिवस भाजपची हवा खाल्यावर त्या सर्वांचे विचार परिवर्तन झाले आणि त्यांनी तात्काळ पुन्हा आपल्या पक्षात म्हणजे शेतकरी कामगार पक्षात स्वगृही घरवापसी केली आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यासह   मोर्बा विभागातील राजकीय वर्तुळात सर्वत्र वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलेले दिसून येत आहे.

      भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या देगाव सरपंच बबिता काटकर यांच्यासह निळगूण आदिवासी वाडीतील श्रीपत काटकर, चंद्रकांत काटकर, प्रकाश वाघमारे, यमुना वाघमारे, परशुराम पवार, सुरेश पवार, अंकुश मुकणे, सीताराम मुकणे इत्यादींसह अनेकांनी आज शुक्रवार दि. ९ ऑगस्ट रोजी शेकापचे जेष्ठ नेते श्री.अस्लमभाई राऊत यांच्या नेतृत्वाखाली माणगांव तालुका चिटणीस श्री. रमेशभाई मोरे यांच्या माणगांव येथील  निवासस्थानी देगावचे उपसरपंच श्री.दिनेश गुगले यांच्या उपस्थितीत परत शेकापमध्ये घरवापसी केली आहे.

 

अवश्य वाचा