चिपळूण  

चिपळूण शिवसेनेचे आक्रमक शहरप्रमुख, पालिकेतील मागासवर्गीय समितीचे सभापती नगरसेवक उमेशदादा सकपाळ यांचा गुरुवारी (दि. 15) वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवशी सामाजिक भान जपणारे श्री. सकपाळ हे आपल्या वाढदिनी शहरातील पाचशे रिक्षाचालकांना विम्याचे कवच देणार आहेत.

श्री. उमेश सकपाळ यांचे सामाजिक काम मोठे आहे. कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता ते अनेक संस्थांना, गरजूंना मदत करीत असतात. वाढदिवस साजरा करताना ते सामाजिक उपक्रम राबवितात. रिक्षाचालक म्हणून काम करताना ते सामाजिक, राजकीय क्षेत्रात पुढे आले. रिक्षाचालक म्हणून सेवा दिल्यामुळे त्यांना रिक्षाचालकांच्या प्रश्नांची जाणीव आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना विम्याचे कवच देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून रस्ता आपत्ती पॉलिसी ते देणार आहेत. या पॉलिसीअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास 25 हजार तसेच जखमी झाल्यास उपचारासाठी 25 हजार रुपये मिळू शकतात. शिवाय सर्प, विंचू दंश झाल्यास, झाडावरुन पडल्यास, पाण्यात बुडून मृत्यू झाल्यासही वारसांना नुकसान भरपाई मिळते. या उपक्रमाबद्दल रिक्षाचालकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

अवश्य वाचा

असंवेदनशील राज्यकर्ते

निर्णय योग्य, पण...

पहिली जागतिक मराठी परिषद

सोनियांच्या द्वारी

तेजोपर्वाची अखेर

विश्‍वकवी रवींद्रनाथ टागोर