७ ऑगस्ट २०१९

म्हसळा येथील श्री राधाकृष्ण मंदिरात शिंपी समाजाची सभा संपन्न झाली.या मध्ये शिंपी समाज अध्यक्ष पदी प्रभाकर करंबे यांची सर्वानुमते अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.उपाध्यक्ष पदी अजय रविंद्र करंबे,सचिव म्हणून संतोष पानसरे तर खजिनदार म्हणून रणजित बारटक्के यांची निवड करण्यात आली.त्याच प्रमाणे महिला मंडळ अध्यक्षपदी नीता महेंद्र ढवळे, उपाध्यक्ष नेहा प्रविण पाटकुळे,महिला मंडळ कमिटी मध्ये निंकिता प्रमोद कळस,सरिता पानसरे,स्नेहल कळस,भावना बारटक्के आणि प्राची जावळे यांना संधी देण्यात आली आहे.शिंपी समाज तालुक्यात फार मोठा नसला तरी या समाजातर्फे विविध उपक्रम,सण-उत्सव,भजन,कीर्तन विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते.प्रभाकर करंबे हे एस.टी. तील सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांचा सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्राचा दांडगा अनुभव असून त्यांना समाजसेवेची आवड आहे.शिंपी समाज विखुरलेला असून तो संघटित होणे अत्यावश्यक असून समाज बांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्याचे अश्वासन प्रभाकर करंबे यांनी याप्रसंगी दिले.महिला अध्यक्षा नीता ढवळे यांनाही सामाजिक क्षेत्राची आवड असून महिलांना संघटित करण्याची इच्छा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.या वेळी मावळते अध्यक्ष संजय पाटकुळे,दिलीप करंबे,दादा पानसरे,महेंद्र ढवळे,मालती करंबे,प्रसाद करंबे,अतुल करंबे,नंदू हेन्द्रे,अमर करंबे,मंदाकिनी करंबे,वैशाली करंबे,जया मिरजकर, आणि मान्यवर समाजबांधव उपस्थित होते.

अवश्य वाचा