चिकोडी

चिकोडी उपविभागातून वाहणार्‍या कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पातळीत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पूरस्थिती आणखी गंभीर बनली आहे. यामुळे अथणी तालुक्यातील हुलगबाळी येथील एक तरुण नदीच्या पात्रातून वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे नदी काठ परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. 

अनेक शाळांमध्ये पाणी घुसले; तर संपर्क रस्त्यांवर पाणी आल्याने रस्ते बंद आहेत. विद्यार्थ्यांना उद्भवणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी 6 व 7 ऑगस्टला चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली. 

चिकोडी उपविभागात आज दिवसभर सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता तर महाराष्ट्रातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. परिणामी आज देखील उपविभागातून वाहणार्‍या कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नद्यांच्या पात्राने आणखी रौद्ररूप धारण केले. यामुळे नदीकाठावरील अनेक गावांना व शेतांना पाण्याचा वेढा पडला आहे. सोमवारी रात्री कोयनेच्या पाण्याने कृष्णेच्या पातळीत आणखी वाढ होणार असल्याची भीती प्रशासनाकडून व्यक्‍त होत आहे. 

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.