मांडवा

सालबादप्रमाणे यावर्षीही टाकादेवी स्पोर्ट्स क्लब व ग्रामस्थ मांडवा  यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १४/०८/२०१९ रोजी दुपारी ठीक २:३० वाजता मांडवा बंदर येथे कुस्त्याचे जंगी सामने आयोजित केलेले आहेत. 

सदर कुस्ती स्पर्धेचे उदघाटन  मा. आमदार श्री भाई जयंत पाटील, (सदस्य महाराष्ट्र विधान परिषद) यांचे शुभहस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे मा. आमदार श्री. पंडितशेठपाटील, हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. व इतर मान्यवरांच्या उपथितीत सदर स्पर्धा संपन्न होणार आहे. 

स्पर्धेत जास्तीत जास्त कुस्त्या विजयी होणाऱ्या १ ते ३ नंबरच्या आखाड्यास आकर्षक ट्रॉफी तसेच स्पर्धेत विजयी मल्लास रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीसे  दिली जाणार आहेत. तसेच महाराष्ट्र केसरी, छत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, मल्ल ह्यांची उपस्थिती हे स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, कल्याण, रेल्वे तसेच रायगड जिल्ह्यातील नामांकित आखाडे सहभागी होणार आहेत. 

तरी सदर स्पर्धेत सर्व आखाडे व कुस्तीगीर मल्लानी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करणेस सहकार्य करावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष व ग्रामस्थ मांडावा ह्यांनी केले आहे.     

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !