इ. स. 1833 सामान्य लोकांचे मोटारीचे स्वप्न साकार करणार्‍या चार चाकी मोटारीत अभूतपूर्व बदल घडवून आणणार्‍या हेन्रीला खरे तर व्हायचे होते घड्याळजी. घड्याळाच्या कामात त्याला लहानपणापासूनच गती होती. त्याची पत्नी त्याला शेतावर घोड्यावर बसून डब्बा घेऊन येत असे. हे लांबचे अंतर कापून त्याची बायको  शेतावर पोहोचली की, या माणसाच्या हाती असलेल्या घड्याळाची टिकटिक ऐकून ती त्याला म्हणत असे, ‘शेतावर मला लवकर येता येईल असे तरी एखादे यंत्र शोधा’. तिची ही रोजची कीटकीट ऐकून हेन्रीने घड्याळ्याची टिकटिक बंद करून तिच्या किटकिटीतून मार्ग शोधण्याच्या प्रयत्नातच एका आधुनिक चारचाकी गाडीचा जन्म झाला. तो असा... 

अमेरिकेतील डेट्रॉइडजवळील डिअरबॉर्न येथे 30 जुलै 1833 रोजी हेन्रीचा जन्म झाला. घड्याळाच्या छंदामुळे त्याचे व त्याच्या वडिलांचे कडाक्याचे भांडण होऊन तो घर सोडून पळून गेला. पुढे वाफेवर चालणारी लहान इंजिने बनविण्याच्या कंपनीत त्याने नोकरी केली. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, रस्त्यावर चालणार्‍या वाहनास या वाफेच्या इंजिनचा उपयोग नाही. त्याच सुमारास त्याला पेट्रोलवर चालणार्‍या एका इंजिनाची माहिती वर्तमानपत्रातून मिळाली. यावरुन त्याने पेट्रोलवर चालू शकणारे एक इंजिन तयार केले. मग त्याने सायकलींची चार चाके एकमेकांना जोडून मध्यभागी चालकासाठी एक सीट, पुढची चाके वळविण्यासाठी एक दांडा, मागच्या चाकांवर इंजिन बसवून, पट्ट्याच्या सहाय्याने इंजिनला गती येईल, अशी यंत्रणा केली. अशा प्रकारे ही टामटुम मोटार हेन्रीच्या शेडमध्ये जन्मली. ही गाडी ताशी 25 ते 30 कि.मी. वेगाने धावत असे. रस्त्यावरील लोकांना सावध कारण्यासाठी एक मोठी घंटा हेन्री वाजवत असे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, हेन्रीचा मित्र अगोदर पुढे जाऊन वाहनाच्या आगमनाबद्दल काही अपघात घडू नये म्हणून लोकांना सावध करीत असे. अमेरिकेतील लोक मोठ्या कुतूहलाने घोड्याविना रस्त्यावर धावणार्‍या या मोटारीकडे पाहात असत. 

तर हन्री फोर्ड ही मोटारगाडी शोधणारा पहिला संशोधक नव्हता. त्याच्या अगोदर इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीत पेट्रोलवर चालणार्‍या गाड्या रस्त्यावर धावत होत्या. पण, त्यात फार त्रुटी होत्या. हेन्रीने आपल्या बुद्धीच्या जोरावर या सर्व त्रुटी दूर केल्या. उदाहरण द्यायचे तर या चार चाकी गाडीचे इंजिन खूप गरम होऊन गाडी बंद पडे, तेव्हा हेन्रीने या इंजिनच्या वर पाण्याची टाकी बसवली. 

यंत्राला विरोध असणारी माणसे त्या काळीसुद्धा होती. त्यामुळे हेन्रीच्या शोधाला अजून लोकमान्यता मिळाली नव्हती. त्याच सुमारास मोटार गाडीच्या शर्यतीत हेन्रीच्या गाडीने सर्वांना मागे टाकले. तो स्वतः कुशल चालक होता. ताशी 64 कि.मी. वेगाने त्याने त्याची गाडी पवळली. तेव्हा वर्तमानपत्रांतून तो एक चर्चेचा विषय बनला. 1908च्या सुमारास 8000 मैल अंतराची मोटारीची लोकप्रियता अफाट वाढली. परंतु, त्याच वेळी त्याच्यावर कफल्लक होण्याची पाळी आली होती. कारण, गाड्यांच्या पेटंटच्या खटल्याचा निकाल त्याच्या विरुद्ध लागला. परंतु, सुप्रीम कोर्टाचा निकाल त्याच्या बाजूने लागला आणि मग मात्र हेन्रीने मागे वळून पाहिलेच नाही.

‘मी जनसामान्यांसाठी मोटारगाडी निर्माण करेन, त्या गाडीची किंमतही कमी असेल’, हे त्याचे वाक्य त्याने सत्यात उतरवले. त्या काळात गाडी घेणे हे गर्भश्रीमंत माणसाचे काम, असा सर्वत्र समज असताना त्या काळातील अत्याधुनिक अशी ‘मॉडेल टी’ नावाची गाडी हेन्रीने जनसामान्यांना भेट दिली, अवघ्या 450 डॉलरमध्ये (23 हजार रुपये). 

अल्पावधीत ‘मॉडेल टी’ अमेरिकेच्या रस्त्यावरून धावू लागल्या. तथापि, काळात हेन्रीला पुष्कळ स्पर्धक होते. तेव्हा त्याने ‘व्ही 8’, मकपुँरी, कॉन्टिनेंटलसारख्या आकर्षक गाड्यांची निर्मिती केली. याही गाड्यांची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशीच त्याने ठेवली. समाजसेवेसाठी त्याने फोर्ड प्रतिष्ठानचीही स्थापना केली. ‘माय लाईफ अँड’ व ‘टुडे अँड टुमारो’ ही पुस्तकेही त्याने लिहिली. 7 एप्रिल 1947 रोजी त्यांचे निधन झाले.

 

अवश्य वाचा