राम फडके उर्फ बाबूजी यांचा जन्म कोल्हापूरचा. त्याचे वडील कोल्हापूरचे प्रख्यात वकील. त्याचे वडील संगीताचे दर्दी. त्यामुळे लहानपणीच संगीताचे बाळकडू त्यांना मिळाले. वयाच्या तिसर्‍या वर्षापासून घरात येणार्‍या भिक्षेकर्‍यांच्या गाण्याची नाक्कल बाबूजी करू लागले. (बाबुजी हे त्यांचे पाळण्यातले नाव.) वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांना पं. वामनराव पाध्ये यांच्याकडे संगीतसाधनेसाठी धाडले. तथापि, वडिलांच्या झालेल्या अकाली निधनाने घरात दारिद्य्राने प्रवेश केला. पुढे आईचेही निधन झाले. तेव्हा भाजीपाला विकून आपली संगीताची साधना त्यांनी चालू ठेवली. या सुमारास ते न.ना. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे धडे गिरवत होते. त्यांनीच त्यांचे राम हे नाव बदलून सुधीर ठेवले आणि त्यानंतर पुढची सहा दशके सुधीर फडके या सहा अक्षरांनी मराठी मनाला मोहिनी घातली. 1941 साली त्यांच्या संगीत कारकीर्दीला प्रारंभ झाला. ‘विझलेली वात’ या नाटकाला त्यांनी संगीत दिले. ‘वंदे मातरम्’ हा त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट. त्यानंतर ‘रुक्मिणी स्वयंवर’ हा बोलपट, तर प्रभातच्या ‘गोकुळ’ या बोलपटाला त्यांनी स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यानंतर ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटाला संगीत दिल्यावर संगीताच्या क्षेत्रात त्यांचे पाऊल मागे पडलेच नाही. महाराष्ट्राच्या संगीत दुनियेत फडके युगच अवतरले. संगीताबरोबर भावगीतांकडेही आपला मोहरा त्यांनी वळवला, ‘अशी पाखरे येती’, ‘कुठे शोधशी रामेश्‍वर’ ही भावगीते फडके गीते म्हणूनच ओळखली जातात. 
मूलतः त्यांनी शास्रीय संगीताच्या आधारावर चाली बांधल्या. भीमपलास या रागांचा वैविध्यपूर्ण आविष्कार त्यांच्या चालींमध्ये आहे. विशेषतः श आणि ष उच्चार त्यांनीच करावा. दिर्ग्दर्शक म्हणून गायक - गायिकांच्या उच्चाराबाबत ते काटेकोर असत. त्याबाबत ते कधीच समझोता करत नसत. काव्याची त्यांना जाण असल्याने भावनेला प्राधान्य देऊन ते हृदयस्पर्शी गात असत. यानंतर एक  अलौकिक कलाकृती, त्यांच्या कंठातून पुढे साकारणार होती. ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो त्या ग.दि. माडगूळकर लिखित ‘गीत रामायण’ पुणे आकाशवाणी केंद्रावरून 10 एप्रिल 1955 रोजी प्रसारित झाले. ‘गीत रामायणा’चे कवी ग.दि.मा. पण लोकांच्या वाटेवर गुणगुणत ठेवण्याचा मान सुधीर फडके यांनाच. त्यांनी देशपरदेशात 2200च्या वर ‘गीत रामायणा’चे कार्यक्रम सुरु केले. ‘गीत रामायण’ ही बाबुजींकडून मराठी संस्कृतीला लाभलेली एक स्थाही स्वरुपाची देणगीच आहे.
त्यांच्या संगीताच्या वाद्यामुळे एकेकाळी त्यांनी केलेल्या शस्त्राचा खडखडाटही हा महाराष्ट्र विसरला नाही. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला दादरा नगर अवेलीय ते अनन्वित अत्याचार करत. तेव्हा बाबूजी, बाबासाहेब पुरंदरे, राजाभाऊ वाकणकर आणि इतर 90 जणांनी मिळून राजधानी सेल्व्हासावर सशस्त्र हल्ला केला आणि हजारोंच्या संख्येने असणार्‍या पोर्तुगीजांना पळवून लावून 15 ऑगस्ट 1954 रोजी हा प्रदेश स्वतंत्र केला. यानंतर बाबूजींनी सारे सारे सोडले आणि एकच ध्यास त्यांनी घेतला, तो सावरकरांच्या जीवनावर एक भव्य चित्रपट काढण्याचे त्यांनी योजिले. 
सावरकरांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट हा जानतेच्या पैशातून व्हावा, हीच बाबूजींची इच्छा होती. शेकडो गीत रामायणाचे कार्यक्रम त्यांनी केले. जनतेने एक रुपयापासून एक लाखापर्यंत भरगोस मदत केली. पण... पण... या चित्रपटाबाबत बाबूजींचे काही हट्ट होते. ते हट्ट दिग्दर्शक, नायक पुरे करू शकत नव्हते. नऊ दिग्दर्शक बाबूजींनी बदलले. लाखो रुपये पाण्यात गेले. ज्याने मराठी जनतेच्या ओटावर राज्य केले त्यांच्या तोंडावर लोक चित्रपट केव्हा पूर्ण होणार, अशी टीका करू लागले. शेवटी उद्विग्न होऊन बाबूजी म्हणाले, ‘वीर सावरकर’ जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी मारणार नाही.’ आणि, अखेर ‘वीर सावरकर’ चित्रपट पूर्ण झाला. घवघवीत यश मिळाले. बाबूजींचे स्वप्न साकार झाले. 29 जुलै 2002 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

अवश्य वाचा