ज्यांची जीवनगाथा ऐकून महात्मा गांधी नतमस्तक होऊन  म्हणाले, "आचार्य देवो भव". अशा या व्रतस्थ प्राध्यापकाची जीवनगाथा काही औरच!बंगालमधील खुलना जिल्ह्यातील ररुली - कपीतरा या एका खेडेगावात प्रफुल्लचंद्र रे यांच्या जन्म २ऑगस्ट, १८६१ रोजी झाला. 

        प्रफुल्लचंद्रांचे वडील हरिश्चन्द्रा हे स्वतः जमीनदार. घरात समृद्धी. त्यांचा फायदा घेऊन मुलांनी शिकावे असे त्यांना वाटे. 'मुलांचे पाय पाळण्यात दिसतात' हे म्हण प्रफुल्लचंद्रानी सार्थ केली. लहानपणापासून वाचनाचा छंद. पुस्तक हातात पडल्यावर त्याचा फडशा पाडल्यावरच उठत 

        माध्यमिक शिक्षणासाठी कलकत्त्यात प्रफुल्लचंद्र आणि त्यांचा भाऊ नलिनीकांत आले. परंतु आजारपणामुळे त्यांची शाळा सुटली पण शिक्षण सुटले नाही. घर हि त्यांची शाळा, ग्रंथ हे त्यांचे गुरु बनले. वाचन करताना त्यांच्या असे लक्षात आले की, प्राचीन संस्कृती आणि लॅटिन भाषेचा तोंडवळा सारखाच आहे, याचा पुढील जीवनात त्यांनी सखोल अभ्यास केला. 

           १८८५ हे वर्ष भारताचा इतिहासातील एक सोनेरी पान. याच वर्षी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. प्रफुल्लचंद्रांच्या जीवनाला कलाटणी  देणारे हे वर्ष ठरले. या सुमारास इंगलंड मध्ये एडीबरो विद्यापीठाने पदवीधर विध्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यात त्यांच्या "१८५७च्या उठावापूर्वीचा भारत आणि वर्तमान भारत' या निबंधाला बक्षिस मिळाले. त्यात  प्रफुल्लचंद्र रे पहिले आले. 

             ढे उच्च शिक्षणासाठी ते परदेशात गेले. तेथे त्यांच जगदीशचंद्र बोस भेटले. भारताच्या शास्त्रज्ञ इतिहासात ज्ञानाचे पूर्व सुरु करणारे हे दोन शास्त्रज्ञ एकमेकांपुढे नतमस्तक झाले. बी. एस. सी. साठी त्यांनी रसायनशास्त्रज्ञ हा विषय निवडून त्याची होप्स स्कॉलरशिपसुद्धा मिळवली.

          भारतात आल्यावर १८८९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये प्रोफेसरची नोकरी करताना इंग्रजांच्या वंशाभिमानाचा फटका त्यांनाही बसला. इंग्रजांच्या दृष्ठीने सैन्यातील भारतीय शिपाई काय किंवा भारतीय शास्त्रज्ञ काय ?दोघेही सारखेच. कारण काळा-गोरा भेद येथेही होताच. युरोपियन प्रोफेसरांना महिना हजार रुपये, तर भारतीय प्राध्यापकांना महिना अडीचशे रुपये पगार! अर्थातच स्वाभिमानी प्रफुलचंद्रानी हि नोकरी सोडून स्वतःचा भारताचा औषधांचा कारखाना काढला. 

                 प्रफुलचंद्र रे हे सच्चे देशभक होते.भारतीयांना  औषधासाठी इंग्लंडवर अवलंबून राहावे लागते म्हणून त्यांनी "बंगाली चेमिकल्स अँण्ड फार्मास्युटिकल वर्क्स"नावाच्या कारखान्याचे रोपटे लावले. आज त्याचे महावृक्षात रूपांतर झाले असून त्याला आलेली औषधरूपी फळे, भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्धी आहेत. स्वातंत्र्य संग्रामातील स्वदेशिच्या चळवळीला प्रेरणा देणारी घटना होती. 

          हवेतील नायट्रोजन कसा वेगळा करायचा हा जगभरातील संशोधकांपुढे पडलेला प्रश्न त्यांनी सोडवला. १८९६ मध्ये पॅरा आणि नायट्रोजन यांच्या संयोगातून 'मर्क्युरस नायट्राईट'तयार केले. त्यांच्या या संशोधनाला जगभरातून मान्यता मिळाली. या शोधामुळे युरोपातील शास्त्रज्ञ त्यांना "मास्टर ऑफ नायट्रेट्स"म्हणत. 

            "मी तर केवळ अपघाताने शास्त्रज्ञ बनलो. माझा मूळचा पिंड इतिहासाचा,"असे ते नेहमी म्हणत. अशा ह्या इतिहासप्रेमी संशोधकाने हिंदू रसायशास्त्राचा इतिहास लिहून जगाला दाखवून दिले कि, भारतीय संशोधनाची परंपरा किती प्राचीन आहे. ह्या थोर शास्त्रज्ञाने सहा वर्षे विदेशी विद्यापीठात राहून जीवनात पाच वेळा जगप्रवास केला. 

             असे हे स्वदेशाभिमानी,इतिहासप्रेमी,साहित्यप्रेमी शास्त्रज्ञ १४ जून, १९४४ रोजी अनंतात विलीन झाले.   

इतर दिनविशेष 

१)१८६१- भारतीय रसायनशास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म 

२)१८६६- आशिया खंडातील पाहिलॆ पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबईत सुरु. 

३)१९२०- राष्ट्रीय पक्षाचे साप्ताहिक "लोकशाही"मुंबईत सुरु. 

४)१९२२- टेलिफोनचा शोध लावणारे अलेक्झांडर ग्रहम बेल यांचे निधन 

५)१९३२- आयरिश अभिनेता पीटर ओटूल यांचा जन्म. 

 

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत